Home Breaking News श्रावण मासातील अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने श्री वरद विनायक मंदिरात भाविकांची गर्दी..

श्रावण मासातील अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने श्री वरद विनायक मंदिरात भाविकांची गर्दी..

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 14/08/2025

हिमायतनगर शहराच्या जवळील असलेल्या नवसाला पावणा-या कनकेश्वर तलाव येथील श्री वरद विनायक मंदिर येथे पवित्र श्रावण मासानिमित्ताने आज अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्याने, गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी हिमायतनगर शहरातील भाविकांसह ग्रामीण भागातील भाविक भक्तांनी एकच गर्दी केली आहे. मंदिर कमेटीने मंदिराचा परीसर अगदी सुशोभित केला असुन, भाविकांना बसण्यासाठी शहरातील व्यापारी बांधवांनी आसणाची देणगी देऊन भक्ताची सोय केली आहे. मंदिराच्या बाजुला तलाव असल्याणे हा परिसर अधिकच सौंदर्याने नटलेला आहे. परिसरातील गार्डनची निर्मीती केली असुन, सांयकाळी मंदिराचा परिसर विदयुत रोषणाईने न्हावुन निघालेला दिसत होता. मंदिराचा परीसर एकंदरीत नयनरम्य असल्याने भाविकांना फोटो काढण्याचा मोह आवरत नव्हता..

Previous articleलोकशाहीचा बुरुज ढासळतोय ?
Next articleसर्वांना न्याय देण्यासाठी काम करणार.. नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्षपदी गणपत पुजरवाड यांचे प्रतिपादण…