मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 24/08/2025
खरीप सन 2025 साठी शासनाने शेतक-यांच्या शेतातील पिकांची माहिती ई-पिक पाहणी अॅपवर प्रत्यक्ष शेतावर जाऊन भरावी अशी सुचना शासनाचे अधिकारी, कर्मचारी प्रसारीत करीत आहेत..परंतु ई-पिकपाहणी अॅप प्रत्यक्ष दर्शनी शेतावर गेल्यानंतर चालतच नाही. वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने शेतक-यांना आपल्या शेतातील पिकांची माहिती देता येत नाही. शेतक-यांने आपल्या शेतातील पिकांची ई-पाहणी केली तर शासनाचे अनुदान, पिक विमा, अतिवृष्टी अनुदान, ई . सर्व शासनाचे अनुदान ई-पिकपाहणी केल्यानंतरच मिळणार आहे. असे अधिकारी, कर्मचारी हे शेतक-यांना ठणकावुन सांगत आहेत. परंतु कितीही प्रयत्न केले असता हे अॅप चालतच नाही. यामुळे शेतक-यांचा वेळ, श्रम, मोबाईल डाटा वाया जात आहे. यावर तहसीलदार यांनी काहीतरी उपाय सुचवावे अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.


