हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्युज, महाराष्ट्र राज्य मो. नंबर – 8983319070
महाराष्ट्र शासनाने प्रथमच 31 ऑगस्ट हा दिवस “भटके विमुक्त दिन ” म्हणुन साजरा करावा असे जाहीर केले होते. भटके विमुक्त समाजाचे स्वातंत्र्यासाठी आणि राष्ट्र उभारण्यासाठी असलेल्या अपूर्व योगदानाची दखल घेऊन शासनाने हा निर्णय घेतला.
त्या निमित्ताने रविवार दि. 31 ऑगस्ट दुपारी 12 वाजता भाजपा कार्यालय वसंत स्मृती, नाशिक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमा मध्ये भाजपाचे नाशिक शहराध्यक्ष मा. सुनील केदार यांनी भटके विमुक्त दिन साजरा करण्याचे करण्याचे महत्वाचे का आहे हे सांगितले. तसेच भटके विमुक्तां साठी असलेल्या वसंतराव नाईक महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. शिक्षणाचा आभाव असल्याने भटके व विमुक्त समाज खऱ्या अर्थाने सामाजिक शैक्षणिक सवलतीपासून वंचित असल्याचे प्रतिपादन भटके विमुक्त आघाडीचे संयोजक बापूसाहेब शिंदे यांनी केले.
या प्रसंगी व्यासपिठावर युवराज मोहित प्रदेश सरचिटणीस, हेमंत शिंदे – अध्यक्ष महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त महासंघ तथा संपादक – ” भटक्या विमुक्तांचे अंतरंग ” सचिव गुलाब सैय्यद, सरचिटणीस व सुत्रसंचालक अमित घुगे, रश्मीताई बेंडाळे, यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
भटके विमुक्तांसाठी काम करणाऱ्या कार्य कर्तृत्वान व्यक्तांचा मान्यवरांच्या उपस्थित सन्मान करण्यात आला. भटके विमुक्त दिना निमित्त विविध रूढी परंपरा यांचे दर्शन घडवीणारे कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन विजय दिवेगावकर, आबासाहेब ट रफले, बाबुराव हिंगे, मयुर गऊल, नवनीत वजिरे, निलेश बाविस्कर, रवींद्र धनगर, दिनेश ठाकरे, कैलास ठाकरे, नितीन कापडी, आकाश शिंदे, यांच्या सह अन्य पदाधिकाऱ्यां केले होते.




