हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज
मो. नंबर – 8983319070
नाशिक महानगर ओबीसी मोर्चाची कार्यकारिणी बैठक दि. 19 नोव्हेंबर बुधवारी रोजी सकाळी 12 वाजता शहर कार्यालय वसंतस्मृती येथे पार पडली. या बैठकी मध्ये ओबीसी मोर्चाच्या संघटनात्मक कार्याबाबत नाशिक महानगर भाजपा सरचिटणीस मा. नाना शिलेदार व सुनिल देसाई सरचिटणीस तथा ओबीसी मोर्चा प्रभारी यांनी मार्गदर्शन केले.
ओबीसी मोर्चाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राबविण्यात येणाऱ्या थेट जनसंपर्क अभियानाची माहिती अध्यक्ष प्रकाश चकोर सरचिटणीस दिपक पाटील वमहिला अध्यक्ष ज्योती चव्हाण के यांनी दिली.
या प्रसंगी उपाध्यक्ष या पदाचे दिलीप देवांग, प्रकाश भालके, अशोक जाधव, ऍड. सीमाताई शिंपी, रेखा कोतकर, सुनिल गोरे, दिपक देव, यांसह सरचिटणीस शंतनु शिंदे, दिपक पाटील, शरद काकड, चिटणीस दत्तात्रय पंडित, शंकर चौधरी, संजय देव, रुपेश शिंदे, वसंत चौधरी तसेच प्रसिद्धी प्रमुख हेमंत शिंदे यांना सरचिटणीस नाना शिलेदार व सुनिल देसाई ओबीसी मोर्चा प्रभारी तसेच अध्यक्ष प्रकाश चकोर व ज्योती चव्हाण के यांच्या हस्ते नियुक्तपत्रे प्रदान करण्यात आली.




