
शहर प्रतिनिधी उमेश मोरखडे 9405277639
श्री, वाक, स्मृती, मेधा,धृती,कीर्ती व क्षमा या सप्तशक्तीच्या महत्त्वावर मार्गदर्शन.
स्थानिक घाटपुरी नाका परिसरातील माँ सरस्वती मंदिराजवळील शिक्षण व संस्कार यांचा संगम असणारी ज्ञानदात्री शाळा म्हणून नावारूपाला आलेल्या आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व जुनियर कॉलेज खामगाव तसेच विद्याभारती संस्थेच्या वतीने सप्तशक्ती संगम या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन आदर्श ज्ञानपीठ मध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश नारीशक्तीच्या सात अंतर्गत शक्तींचे जागरण करणे व संस्कारयुक्त शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडणीत महिलांचे योगदान अधिक बळकट करणे हा होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली सोबतच आदर्श ज्ञानपीठाची नीव ज्यांच्या पावन विचारधारेतून ठेवण्यात आली अशा थोर समाजसेविका तथा मुख्याध्यापिका स्व. विजयाबाई कन्हैयासिंह राजपूत मॅडम यांच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण करून, करण्यात आली. सप्तशक्ती संगम कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान आदरणीय मोहता मॅडम यांनी स्वीकारले तर प्रमुख उपस्थिती खेतान मॅडम यांनी भूषविली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्या सौ पळसकर मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. इरतकर मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. होणवलकर मॅडम यांनी केले. कार्यक्रमाची शोभा वाढविण्याचे कार्य हजारे मॅडम यांनी स्वागत गीत गाऊन केले तर या मंगल प्रसंगी कु. सिया हिने आईगिरी नंदिनी या स्वरांवर छानसे नृत्य सादर केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून सौ गायत्री विप्रदास (जळगाव जामोद) ह्या लाभल्या होत्या सोबतच त्यांच्या सहचारिणी सौ रेणुका पाठक यांनी सुद्धा कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. गायत्री ताईंनी विद्याभारतीच्या संस्काराधीष्टीत शिक्षण पद्धतीचे कौतुक करत नारीशक्ती ही कुटुंब समाज व राष्ट्राची आधारशीला असल्याचे प्रतिपादन केले. श्री, वाक, स्मृती, मेधा,धृती,कीर्ती व क्षमा या सप्तशक्तीच्या महत्त्वावर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी विविध प्रेरणादायी विचार अनुभव कथन व सांस्कृतिक सादरीकरणातून महिलांमधील आत्मविश्वास स्वावलंबन व सामाजिक जबाबदारीचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाची शोभा वाढविण्याचे कार्य सौ प्रियंका राजपूत मॅडम यांच्या पावन विचारधारेतून समाजकार्य करणाऱ्या स्त्रियांचा शाल व बुके देऊन गौरव करण्यात आला सर्वप्रथम समाजसेविकास सौ गायत्री विप्रदास मॅडम, आदर्श ज्ञानपीठ च्या प्रथम मुख्याध्यापिका सौ डहाके मॅडम तर जेष्ठ शिक्षिका सौ महाजन मॅडम यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास मोठ्या समूहाने स्त्री पालक वर्ग व शाळेजवळील स्त्री वर्ग तसेच आदर्श शाळेच्या सर्व शिक्षिका व शिक्षकेतर वर्ग यांनी मोठ्या प्रमाणात व उत्साहात उपस्थिती दर्शविली. आदर्श शाळेतर्फे महिलांसाठी चहा वाटप करण्यात आला.समस्त महिला वर्गाने कार्यक्रमात स्वतःचे मनोगत व्यक्त करून प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे पावित्र्य राखून संपूर्ण महिलावर्गाने पर्यावरण संवर्धन करण्यासाठी प्लास्टिक वर बंदी घालण्याची शपथ एकसंग एक मुखाने घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता शाळेचे सदस्य कवीश्वर सिंह राजपूत सर पर्यवेक्षिका सौ राजपूत मॅडम शाळेच्या प्राचार्या ज्येष्ठ शिक्षिका शिक्षिका व शिक्षकेतरवर्ग या सर्वांचे मोलाचे हातभार लाभले शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




