Home कविता कोवळ्या भारता…!!

कोवळ्या भारता…!!

इंडिया वाले सैराट झाले.
भारत पेटवायला भोंगे आणले.
राम वापरुन झाला .
आता हनुमान चालीसा सुरू झाला.
तुझाच धर्म, तुझीच अस्मिता
असे सांगून पेटवितात दोस्ता.
काल हातात तलवारी दिल्या.
ऊद्या देशी कट्टा ही देतील.
भारत जाळतांना, इंडिया वाले.
षढयंत्र पुर्वक हिंदू झाले.
तुझं, स्वप्न, भविष्य आणि कुटुंब खाक होते.
तिथूनच त्यांच्या सत्तेचा मार्ग जाते.
योगायोग नाही, समजून घे भावा.
इंडिया वाल्यांचा हा गनिमी कावा.
कोवळा भारत कोर्ट, कचेरी, जेलात
इंडिया वाला सत्तेच्या सभागृहात…!!
घर शाकारणी असते पावसाळ्यापूर्वी.
तशीच तरुणाई सांभाळावी दंगली पुर्वी.
दिवस वै-याचे आणि रातही वै-याची आहे.
कोवळ्या भारताला जपायचे आहे…!!
.जपायचे आहे…!!

@.. भास्कर भोजने.

Previous articleमहावितरणची लोडशेडींग आणि सामान्य जनतेचं मरण….
Next articleपिक कर्ज माफी न मिळाल्याने शेतकर्यांचा उपोषणाचा इशारा…