Home समाजकारण सामुहिक विवाह मेळाव्याचे आयोजन.

सामुहिक विवाह मेळाव्याचे आयोजन.

जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड

दिनांक- 24 एप्रिल 2022

उन्हाळ्याचे दिवस अन् वधुवराची लगीन घाई! सध्या ग्रामीण असो व शहरी भागातील लोकांची धावपळ पाहता लग्नसराईचे दिवस आले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोणाच्या प्रार्दुभावामुळे सामुहिक विवाह मेळावे होऊ शकले नाही.
मौजे सवना ज. येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी दिनांक 25 एप्रिल 2022 रोजी सामुहिक विवाह मेळाव्याचे आयोजन समस्त सवना ग्रामस्थांनी आयोजित केला आहे.
या मेळाव्यात एकुण सहा जोडपे विवाहबद्ध होणार असून, त्यासाठी गावकऱ्यांनी अत्यंत चांगली तयारी केली आहे.
कमी खर्चात बचत व्हावी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून, यासाठी अशा सामुहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करणे , हे ईतर गावकऱ्यांना खरोखरच आदर्शवत वाटावा असा आदर्शवत उपक्रम आहे. अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे.
या कार्यक्रमाला गावातील जेष्ठ, तरुण बांधवांचे सहकार्य मिळत आहे.

Previous articleआ. जवळगावकरांमुळे कारला गावातील रस्त्यांचा प्रश्न सुटला… डॉ गफार
Next articleइंटरसिटी रेल्वेखाली आल्याने दोन तुकडे होऊन झाला युवकांचा मृत्यू; सर्वत्र हळहळ