Home Breaking News स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाच्या घोषणेने नाशकात दिव्यांगांचा जल्लोष ! . .

स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाच्या घोषणेने नाशकात दिव्यांगांचा जल्लोष ! . .

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

नाशिक : अनेक वर्षांपासुन असलेली दिव्यांगांची स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची प्रमुख मागणी मान्य झाल्याने प्रहार दिव्यांग संघटना नाशिक चे वतीने पंचवटी येथे लाडु वाटुन जल्लोष करण्यात आला,दिव्यांग हा समाजाचा सर्वात वंचित दुर्बल घटक असुन त्यांना मिळणारा शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत होते, यासाठी दिव्यांगांचे नेते बच्चु कडु यांनी सातत्याने विधानसभेत सर्व सरकार कडे ही मागणी केली होती त्या नुसार स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याने दिव्यांगांनी त्यांचे व माजी राज्यमंत्री बच्चु कडु आभार मानले, दिव्यांगांनी हा आनंदोत्सव साजरा करताना पंचवटी येथील प्रमुख चौकात केलेला डान्स बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली, या प्रसंगी प्रहार दिव्यांग संघटना नाशिक चे जिल्हाध्यक्ष ललित पवार, प्रहार जनशक्ती चे उ.म.संपर्क प्रमुख दत्तु बोडके जिल्हाध्यक्ष आनिल भडांगे, कार्याध्यक्ष बबलु मिर्झा, उपजिल्हाध्यक्ष रुपेश परदेशी, ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सांगळे, जिल्हा समन्वयक, संध्या जाधव जिल्हा चिटणीस,समाधान बागल, जीतु सानप दिलीप पाटील, निलिमा पगारे रणजित आंधळे, किरण सोनवणे, प्रमोद केदारे, राजु शेख, श्रीहरी क्षीरसागर, काशिनाथ येलमामे, जयंत थेटे, जाॅन जोसेफ जयेश चव्हाण संदीप जाधव आदी सह दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला*

Previous articleवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने विविध पदासाठी निवड
Next articleसंभापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वयेचा फलक लावण्यात यावा:-अजयसिंह राजपूत