Home Breaking News सोनगांव जिल्हा परिषद शाळेत नवीन पाल्याचे स्वागत , विद्यार्थी देवो भव. असल्याची...

सोनगांव जिल्हा परिषद शाळेत नवीन पाल्याचे स्वागत , विद्यार्थी देवो भव. असल्याची भावना जणु शिक्षकानी समस्त ग्रमस्थाना करुन दिली.

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा

आज सोनगांव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज पहिल्या दिवशी नवीन पाल्याची (विद्यार्थी) पटसंख्या समाधान कारक.

प्राथमिक शाळेच्या प्रागणात आज नवीन विद्यार्थाचे गुलाब पुष्प देउन ,तसेच विद्यार्थांचे शाळेतील पहिले पाउल घेउन स्वागत करण्यात आले.ह्यावेळी विद्यार्थांना शालेय पाठपुस्तकाचे वाटप मान्यवर्याच्या हस्ते करण्यात आले.तसेच विद्यार्थांना शालेय गणवेश वाटप करुन ,गावात सर्व विद्यार्थाची ट्रॅक्टर मध्ये बसवुन टोल वाजवत मिरवणुक काढुन नवीन पाल्याच्या अँडमिशन साठी जन जाग्रुती करण्यात आली. मिरवणुकी नंतर सर्व शाळा पुर्व तयारी करण्या संदर्भात मेळावा घेण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेतील सर्व विद्यार्थांना मिस्टान अन्न जेव घालुन पहिला दिवस साजरा करण्यात आला. ह्या वेळी सर्व विद्यार्थांच्या चेहरावर आनंद दिसुन येत होता. संपुर्ण कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ,सोनगांव ग्रामपंचायत संरपच, सदस्य,विद्यार्थ पालक,अंगणवाडी सेविका, शालेय कमेटी सदस्य,व शिक्षण प्रेमी मोठ्या संखेने पुर्ण वेळ उपस्थित होते.कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडण्याकरिता शाळेचे मुख्याध्यापक येवले सर,व वाद्रे मँडम यानी नियोजन करुन कार्यक्रम यशस्वी केला

Previous articleहिमायतनगर किनवट राष्ट्रीय महामार्ग झाला चिखलमय
Next articleआदिवासी मजुरावर अस्वलाचा हल्ला