Home Breaking News गुरू रविदास चर्मकार महासंघा ची बैठक संपन्न

गुरू रविदास चर्मकार महासंघा ची बैठक संपन्न

गुरु रविदास चर्मकार महासंघाचे संघटन मजबूत करा-लक्ष्मणदादा घुमरे

शेगाव,संग्रामपूर येथील नवनिर्वाचित पदाधिकारी च्या नियुक्या जाहीर

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी खामगाव
खामगाव -गुरू रविदास चर्मकार महासंघा चे संघटन कसे मजबूत होईल असा प्रत्येक पदाधिकारी यांनी प्रयत्न करावा तसेच समाजाच्या नागरिकांवर होणारे अन्याय अत्याचार झाले तर त्यांना कसा न्याय देता येईल या करिता देखील संघटने च्या प्रत्येक पदाधिकारी यांनी अग्रेसर राहावे मी नेहमी तुम्हच्या सोबत आहे असा विश्वास संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण दादा घुमरे यांनी बैठकी दरम्यान दिला
गुरू रविदास चर्मकार महासंघ बुलढाणा जिल्हा कार्यकारणी बैठक शेगाव येथे विश्राम भवन दि.7 ऑगस्ट रोजी पार पडली यावेळी ते बोलत होते. बुलढाणा घाटाखालील शेगाव,संग्रामपूर,जळगाव जामोद,तालुक्यातील पदाधिकारी च्या नियुक्त्या करण्यात आल्या.यामध्ये *महेश शेंकोकार सर यांची अमरावती विभागीय अध्यक्ष पदी तर बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी,प्रकाश शेंगोकार याची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच उपाध्यक्ष पदी गजानन शेंगोकार,संजय माठे जिल्हासचिवपदी नारायण शेगोकार,शेगाव तालुका अध्यक्ष सूरज घोपे,उपाध्यक्ष गणेश शेंगोकार, संदीप सुपोकर,संतोष वानखडे,सचिव प्रल्हाद गव्हाळे,संपर्क प्रमुख पदी लक्षीमन चिम तर शेगाव महिला तालुका अध्यक्ष पदी श्रिमती पुष्पाताई घाटे,महिला शहर अध्यक्ष पदी सौ.विजया मानकर,तसेच शेगाव शहर अध्यक्ष महादेव डाखोडे,शहर उपाध्यक्ष बाळकृष्ण चिमनकर, शहर उपाध्यक्ष भरत दास,युवा तालुका अध्यक्ष रजन शेंगोकार,युवा शहर अध्यक्ष नागेश कळस्कार,युवा शहर उपाध्यक्ष विजय पानझाडे,गटई कामगार जिल्हाअध्यक्ष प्रकाश माधवे,शहर अध्यक्ष राजेश वैरभैया,शहर उपाध्यक्ष बाळू पसरटे, तर संग्रामपूर तालुका अध्यक्ष मंगेश वानेरे*,या सर्व पदाधिकारी च्या नियुत्या करण्यात आल्या यावेळी प्रदेश अध्यक्ष राज कुमार नाचणे,कार्याध्यक्ष कांशीराम डांगे,उपाध्यक्ष उत्तम घोपे,महासचिव ऍड शेषराव गव्हाळे,सह संचिव दादाराव वानखडे, प्रवक्ता प्रंशातभाऊ भटकर याची प्रमुख उपस्थिती होती.तसेच प्रदेश अध्यक्ष राजकुमार नाचणे ,व ऍड शेषराव गव्हाळे,कांशीराम डांगे यांनी देखील आपले मनोगत वक्त केले,सुत्रसंचालन प्रशांतभाऊ भटकर तर आभार प्रदर्शन प्रकाशभाऊ शेगोकार यांनी केले यावेळी चर्मकार समाजासह गुरू रावीदास महासंघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती बुलढाणा जिल्हा मीडिया प्रमुख गणेश पानझाडे यांनी प्रसिद्ध पत्राद्वारे दिली आहे.

Previous articleजि.प.प्रा.शा.कोठा तांडा ने क्रांती दिन मानवी साखळीचे आयोजन करून केला साजरा…
Next articleपंचवीस वर्षांनी सवना ज. सोसायटी अखेर बिनविरोध