Home Breaking News जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४१४ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४१४ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर

👉 खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठपुराव्याला यश ९ लाख शेतकरयांना मिळणार विमा.

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 21/10/2022

नांदेड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्याने भरलेला.पीक विमा मंजूर करावा, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून देण्यासाठी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यशस्वी पाठपुरावा केला . त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील 8 लाख 92 हजार 117 शेतकऱ्यांसाठी 414 कोटी 73 लाख रुपयांचा पिक विमा मंजूर झाला आहे. पिक विम्याच्या रकमा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली आहे.
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते . जिल्ह्यातील पाच लाख हून अधिक हेक्टर वरील पिकांना फटका बसला होता. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता अशा शेतकऱ्यांसाठी पिक विमा त्वरित मिळावा या अनुषंगाने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. नांदेड जिल्ह्यातील 8 लाख 92 हजार 117 शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता. सोयाबीन, कापूस, तूर आणि ज्वारी पिकासाठी हा भरण्यात आलेला विमा, विमा कंपनीने अखेर मंजूर केला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 414 कोटी 73 लाख रुपयांचा विमा मंजूर झाला आहे .
जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील शेतकरयांना 13 कोटी 94 लाख, भोकर तालुक्यासाठी 24 कोटी 50 लाख , बिलोली साठी 28 कोटी 16 लाख, देगलूर साठी 34 कोटी 7 लाख, धर्माबाद साठी 16 कोटी 13 लाख, हदगावसाठी 47 कोटी 77 लाख, हिमायतनगर साठी 16 कोटी 48 लाख ,कंधार साठी 39 कोटी 16 लाख, किनवट साठी 15 कोटी 65 लाख, लोह्यासाठी 43 कोटी 2 लाख, माहूरसाठी 11 कोटी 91 लाख, मुदखेडसाठी 14 कोटी 28 लाख, मुखेडसाठी 44 कोटी 97, नायगावसाठी 31 कोटी 43 लाख, नांदेडसाठी 17 कोटी 10 लाख तर उमरी तालुक्यासाठी 16 कोटी 7 लाख असा 441 कोटी 73 लाख रुपयांचा पिक विमा मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विम्याच्या या रकमा लवकरच जमा होतील अशी माहितीही खा. चिखलीकर यांनी दिली आहे

Previous articleपोलीस उपायुक्त संजय बारकुंड बनले सुपर रँन्डोनिअर
Next articleजुगार शेतीचा