Home Breaking News स्वाभिमानीच्या जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील आत्मदहनाचा प्रयत्न

स्वाभिमानीच्या जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील आत्मदहनाचा प्रयत्न

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी

खामगाव:तहसीलदार यांच्या दालनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील यांचा आत्मदहनाचा प्रयत्न मागील वर्षा मध्ये झालेली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई मध्ये खामगाव तालुका समाविष्ट करण्यात यावा. तसेच सन २०२२ मध्ये शेतकऱ्यांनी काढलेला पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी या मागणी करीता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमोल पाटील यांनी आज खामगांव उपविभागीय अधिकारी कार्यालया च्या इमारतीत तहसीलदार दार यांच्या दालनात अंगावर डिझेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलीस वेळेवर त्या ठिकाणी पोहचल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन मध्ये आणले असून पोलीस कारवाई सुरु आहे.

Previous articleकोल्हापूर येथील बर्गमन ( हाफ आयर्नमेन)स्पर्धेत महाराष्ट्रातून प्रथम पत्रकार म्हणून रमेश चव्हाण यांनी विक्रम नोंदवला ..
Next articleहिंगणा उमरा येथे राबविण्यात आली ‘स्पर्श कुष्ठरोग आणि क्षयरोग जनजागृती अभियान’ मोहिम..!!