Home Breaking News परमेश्वर मंदिर कमान ते रेल्वेगेट रस्त्याची दयनीय अवस्था!

परमेश्वर मंदिर कमान ते रेल्वेगेट रस्त्याची दयनीय अवस्था!

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड

दिनांक – 14 जानेवारी 2023

नांदेड ते किनवट महामार्गरील हिमायतनगर तालुक्यातील रेल्वे गेट ते परमेश्वर मंदिर कमान या रस्त्याची दुरवस्था सर्वसामान्य सहित अनेकांच्या आरोग्यास हानिकारक बनत चालली आहे.
या रोडवर तहसिल, पंचायत समिती, भुमी अभिलेख, रजिस्टरी कार्यालय, पेट्रोल पंप, रेल्वे गेट अशी अनेक कार्यालय आहेत. या कार्यालयात शेतकरी, सर्वसामान्य नागरिक जात असतांना कमालीला धुळीला वैतागून गेला आहे. विद्यमान आमदार महोदयांसहित, विविध सामाजिक संघटना यांनी देखील या रस्त्याची दुरवस्था अनेकवेळा चव्हाट्यावर आणली होती. पण कुठे पाणी मुरत आहे. याचा शोध आजतागायत लागला नाही.
16 फेब्रुवारी पासून हिमायतनगर येथील जागृत देवस्थान श्री परमेश्वराची यात्रा या तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा गेल्या अनेक वर्षांपासून भरते आहे. तरीही या रस्त्याचा प्रश्न अजुन तरी अपुराच आहे. संबंधित ठेकेदार कोण्या नेत्यांचा नातलग आहे. याचा शोध घेऊन त्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Previous articleकोसमेट ते शिवणी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे!
Next articleयुवाशक्ती ग्रामविकास संगठनचे प्रथम राज्यस्तरीय अधिवेशन डहाणू येथे संपन्न झाले.