Home Breaking News संजयभाऊ चाभरेकर यांचा कृषि महोत्सवात सपत्नीक गौरव!

संजयभाऊ चाभरेकर यांचा कृषि महोत्सवात सपत्नीक गौरव!

जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 04 मार्च 2023

नांदेड येथील नवा मोंढा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा कृषी महोत्सवात हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथील प्रगतिशील शेतकरी संजयभाऊ चाभरेकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यांनी कृषि क्षेत्रातील उत्तम कामगिरी बजावली आहे. त्यात बळीराजा हायटेक नर्सरी मध्ये टोमॅटोचे 🍅 बिजोत्पादन घेतले असून, चांगले काम केल्यामुळे नांदेड कृषि महोत्सवात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन त्यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. यापूर्वी त्यांनी आपल्या शेतात सामुहिक शेततळे, फळबाग लागवड, गांडुळ खत, यांत्रिकीकरणात हळद शिजविण्यासाठी कुकर, आंतर मशागत करण्यासाठी पाॅवर विडर अशा नवनविन यंत्राचा वापर करून, शेती केली आहे. शेतकरी सुखी होऊ शकतो. हे त्यांनी दाखवून दिले आहे.
या कामगिरीमुळे त्यांचा गौरव करण्यात आला आहे. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी रणविर सर, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव साहेब, कृ.प. काळे, कृस आडे, वानखेडे, माझळकर, कोटुलवार, लोखंडे, माने, सौ ढगे मॅडम, भिसे मॅडम, फोलेसाहेब, पिपरखेडे, सूदेवाड, कांबळे, रसाळे, अनछत्रे, अक्कलवाड आदींनी अभिनंदन केले आहे.

Previous articleवाडेगावच्या मुलीचा खो.खो संघ विजयी
Next article*माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या उपोषण व धरणे आंदोलनाला यश*