Home Breaking News लग्नाला जात असलेल्या स्विफ्ट डिझायरला दर्यापूर जवळ मोठा अपघात

लग्नाला जात असलेल्या स्विफ्ट डिझायरला दर्यापूर जवळ मोठा अपघात

उमेश मोरखडे शहर प्रतिनिधी

◼️ अपघातात तीन जण ठार
◼️बुलढाण्यातील दोघांचा समावेश

बुलढाणा, 13 एप्रिल : बुलढाण्यातील आपल्या मित्राच्या लग्नासाठी अमरावती येथे जात असलेल्या चार जणांच्या स्विफ्ट डिझायरला दर्यापूर जवळ मोठा अपघात झाला. या अपघातात स्विफ्ट डिझायर मधील दोन जागीच ठार झाले असून इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुड इव्हनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार बुलढाण्यातील पवन देशमुख यांचे आज संध्याकाळी अमरावती येथे लग्न होते. या लग्नासाठी त्यांचे वर्गमित्र स्विफ्ट डिझायर गाडीने अमरावती कडे रवाना झाले होते. अकोल्याच्या पुढे दर्यापूर जवळ एक बाईक सवार आणि स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये जोरदार टक्कर झाली. बाईकस्वार जागीच ठार झाला तर स्विफ्ट डिझायरने चार-पाच पलट्या खाल्ल्या. या भीषण अपघातात स्विफ्ट डिझायर मधील हे दोन जण जागीच मृत्युमुखी पडले तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना अकोला येथे उपचारासाठी तत्काळ रवाना केले असल्याची माहिती आहे.

Previous articleवाडेगांवात एका कुटूंबाचा दुसऱ्या कुटूंबावर तूफान दगडफेक
Next articleसंभापूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.