Home Breaking News शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या योजनेचा लाभ घ्यावा.

शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या योजनेचा लाभ घ्यावा.

👉 दिलीप जाधव ता. कृ. अ. हिमायतनगर

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 18 जुन 2023

हिमायतनगर तालुक्यातील मौजे मोरगांव येथे महाराष्ट्र शासन कृषि विभागाने “खरीपाची तयारी कृषि विभाग आपल्या दारी” या मोहिमेअंतर्गत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी भाऊसाहेब ब-हाटेसर, प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी रणविर साहेब, ता. कृ.अ. जाधव साहेब, कृषि पर्यवेक्षक एम.एस.काळे साहेब, संरपंच, उपसरपंच आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांचा शाल, पुष्पहार, नारळ देऊन सत्कार करण्यात आला.
आपल्या प्रास्ताविकातून जाधव साहेब यांनी मनोगत मांडतांना हिमायतनगर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी, शासनाच्या महाडीबिटी या पोर्टलवर आपला अर्ज आॅनलाईन करणे आवश्यक आहे. त्यामध्ये ठिंबक संच, तुषार सिंचन, गांडुळ खत युनिट, यांत्रीककरणं, फळबाग, सोयाबीन लागवड करतांना बिबिएफ यंत्राचा वापर करून लागवड करावी. यावेळी कृषि विभागाच्या वतीने मिनीकिटचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.
जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी ब-हाटे साहेब यांनी आपल्या मनोगतात सांगितले जमिनीची शुन्य करुणे, खताचा खर्च कमी करून, कृषि विभागाच्या विविध पुस्तकांचे पारायण करणे गरजेचे आहे. असेही ते म्हणाले.
उपविभागीय कृषी अधिकारी रणविर साहेब यांनी सोयाबिन, कापुस, तुर या पिकाच्या लागवडीची सविस्तर माहिती दिली. यावेळी गावातील संरपंच, शेतकरी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जाधव साहेब यांनी केले. तर सूत्रसंचालक आणि आभार एम.एस. आडे साहेब यांनी मांडले.

Previous articleबळीराजा जगला तरच… देश जगेल!
Next articleकारची समोरासमोर धडक, तीन गंभीर जखमी; पिंजर ते बार्शिटाकळी रस्त्यावरील घटना