Home Breaking News “जिवनाच्या प्रवासात”

“जिवनाच्या प्रवासात”

*समाजातील ओळख, मैत्री, विश्वास, प्रेम, उपकार, आदर, श्रध्दा आणि भक्ती या प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील एका सुंदर प्रवासाच्या पायऱ्या आहेत. कोणी कोठे आणि किती वेळ थांबायचे हे ज्याचं त्यानं ठरवायचं असत.*

*आयुष्याच्या प्रवासात अनुभवलेल्या गरिबीला सोबत घेतलं तर आभाळा एवढी उंची गाठण्याचा प्रवास सोपा होत जातो*

*समाजात समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आपल्या आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात…*

*गर्दीत आपली माणसं ओळखायला शिकलात, तर संकटाच्यावेळी आपली माणसं गर्दी करायला विसरत नाहीत….!!!!!!*

*आयुष्याची गणितं खरंतर बोटांवर सोडवण्याइतकी सोप्पी असतात. पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवतात.*

*जीवनाच्या प्रवासात, एक गोष्ट नक्की शिकायला मिळते, आधार द्यायला थोडेच, पण धक्का मारायला खूप लोक येतात. श्वास सोडल्यावर, माणूस एकदाच मरतो, पण जवळच्या व्यक्तीने, साथ सोडल्यावर माणूस रोज, थोडा थोडा मरत असतो. समजूतदारपणा आणि शांतता, हे वयावर नाही… तर आयुष्यात आलेल्या, अनुभवांवर अवलंबून असतात…!!*_

*या जगात सर्व काही सापडेल, पण स्वतःची चूक मात्र कधीच सापडत नाही, पण ज्या दिवशी ती सापडेल त्या दिवसा पासून आपले आयुष्य हमखास बदलून जाईल.*

*विचारांचा प्रभाव मनावर पडतो, मनाचा प्रभाव शरीरावर पडतो, शरीर आणि मन या दोन्हींचाही प्रभाव जीवनावर पडत असतो, म्हणून नेहमी चांगले विचार मनात आणावेत आणि समाधानी राहावे.*

*प्रवास कालही होता, प्रवास आजही सुरुच आहे, माहिती आहे की काही इच्छा तुटल्या आहेत, पण काही इच्छा अजूनही बाकी आहेत. आहारात सत्व, वागण्यात तत्व आणि बोलण्यात ममत्व असेल तरच जीवनाला खरं महत्त्व येतं*

*कुणीही तुमच्या पाठीशी असो किंवा नसो.. आपला आत्मविश्वास आपल्या सोबत असू द्या. कुणाच्या सहाऱ्याची.. कधीच गरज भासणार नाही…!*

*समाधान शोधतांना इतरांच्या आनंदाला ठेच लागू नये याची जाणीव झाली, की आपली वाटचाल ही परिपक्वतेकडे चाललीय हे निश्चित समजावे.*

*कोसळण्यातही एक लय असते, ते पावसाच्या थेंबांकडून शिकावं… आपटण्यातही किती मजा असते, ते समुद्राच्या लाटांकडून शिकावं… संपण्यातही मोठ्ठे समाधान असतं, ते अगरबत्तीच्या राखेकडून शिकावं… कर्तृत्वाचा शेवटही सुंदर असू शकतो, ते मावळणाऱ्या सूर्याकडून शिकावं…!*

*बोलून दाखवायचं नाही, बस लक्षात ठेवायचं. कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणं केव्हाही चांगलं. कारण लोक खोटे बोलून माणसं जिंकतात तर आपण खरं बोलून सगळ्यापासून दूर राहतो.*

*हात कितीही लांब पसरले तरी हवं ते हाती लागेलच असे नसते. करार असतात काही या आयुष्याचे. निमुटपणे सहन करायचे.*

*जीवनाला श्रीमंतीचा साज असावा, पण त्यात संपत्तीचा माज नसावा. कारण तुम्ही सृष्टीचे पाहुणे आहात, मालक नाही. पाहुणचार संपला की, कळणारसुद्धा नाही, स्वतःची राख झाली की, माती…*

*साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे. क्षमा ही परम शक्ती आहे. नम्रता हा सर्वोत्तम युक्तीवाद आहे. आणि ओळख हा चांगला संबंध आहे. फार कमावून गमावण्यापेक्षा, मोजके कमावून जतन करणे, फारच महत्वाचे आहे. मग तो पैसा असो की माणसे…!!*
✍️✍️ *मारोती अक्कलवाड पा. सवनेकर*
*जिल्हा संपादक नांदेड*

Previous articleखामगाव शहरामध्ये 3 कोटी 80 लाख रुपयांचे 70 सीसीटीव्ही कॅमेरे लागणार :आ. आकाशदादा फुंडकर यांच्या प्रयत्नांना यश.
Next articleआरक्षणाचा हक्क मिळावल्या खेरीज धनगर समाज स्वस्थ बसणार नाही –