Home Breaking News हिमायतनगर पोलीस ठाण्यात रेझिंग डे साजरा..

हिमायतनगर पोलीस ठाण्यात रेझिंग डे साजरा..

👉🏻जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस स्थापना दिनाच्या दिल्या शुभेच्छा…

अंगद सुरोशे
हिमायतनगर प्रतिनिधी/- 2 जानेवारी 1961 रोजी तत्कालीन पंतप्रधान यांनी ह्या दिवशी पोलीस दलाला पोलिस ध्वज अर्पण केला होता तेव्हा पासून दोन जानेवारी हा दिवस पोलीस स्थापना दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो याचेच औचित्य साधून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांनी हिमायतनगर येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनुर यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देत पोलीस स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व उपस्थित पदाधिकारी व कर्मचारी यांना सुद्धा पोलीस स्थापना दिनाच्या शुभेच्छा देऊन येथील पोलीस स्थानकात रेजिंग डे साजरा केला…

या बाबत सविस्तर वृत्त असे की दरवर्षी महाराष्ट्र सरकारकडून 2 जानेवारी हा पोलीस स्थापना दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो 2 जानेवारी ते 8 जानेवारी या दरम्यान शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यामध्ये बोलाऊन पोलीस कर्मचाऱ्यांच्या विविध कामकाजाची माहिती देऊन विविध शस्त्रा बद्दल पोलिसानं कडून मार्गदर्शन केले जाते या सर्व बाबीचे गांभीर्याने लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांनी दोन जानेवारीच्या सायंकाळी येथील पोलीस स्थानकात भेट देऊन सर्वसामान्य नागरिकांच्या संरक्षणासाठी अहोरात्र संरक्षण करणारे पोलीस दलाचे जवान म्हणून कर्तव्यावर काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान म्हणून भारतीय जनता पार्टी तर्फे हिमायतनगर येथील पोलीस निरीक्षकासह पोलिस कर्मचाऱ्यांना पोलीस स्थापना दिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गजानन तुप्तेवार, डॉ.प्रसाद डोंगरगावकर, तालुका अध्यक्ष गजानन चायल, हदगाव तालुका अध्यक्ष तात्याराव पाटील, अक्षय भोयर ,शहराध्यक्ष विपुल दंडेवाड, खंडू चव्हाण, किशोर रायेवार, हिदायद खान,सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष नागेश शिंदे,कल्याण ठाकूर,दुर्गेश मंडोजवार,शीतल सेवनकर,ओमकार चर्लेवार, नितीन मुधोळकर,लक्ष्मण डांगे, शीतल सेवनकर,योगेश अंनगुलवार,विशाल अंनगुलवार ,प्रमोद भुसाळे,गजानन पिंपळे,प्रकाश सेवनकर, ज्ञानेश्वर ढोणे, परमेश्वर नागेवाड सह भारतीय जनता पक्षाचे व युवा मोर्चाच्या असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्राचे काम लवकरात लवकर सुरू करा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन.
Next articleविश्वशांती बुद्ध विहार जय भीम नगर वाडेगाव येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी