Home Breaking News प्रजासत्ताक दिन व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न..

प्रजासत्ताक दिन व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न..

संभापूर येथील जि.प.म.उ.प्रा.शाळेत प्रजासत्ताक दिनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.

संभापूर-(अजयसिंह राजपूत) २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिवस मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. गावातून सर्व प्रथम प्रभात फेरी काढण्यात आली. या दिवशी सुरुवातीला ग्रामपंचायतीचे ध्वाजारोहण सरपंच सौ ज्योती पवार यांच्या हस्ते करण्यात आले नंतर राष्ट्र गीत म्हणण्यात आले. त्यानंतर शाळेतील ध्वजारोहण शाळा समितीचे अध्यक्षा विद्याताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शाळा समिती चे सदस्य, मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे, आणि शिक्षक वृंद यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पा अर्पण करण्यात आले. या प्रजासत्ताक दिना निमित्त शाळेत मागील आठवड्यापासून विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. एक आगळा वेगळा उपक्रम वर्ग सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम गावकऱ्यासाठी आदर्श उपक्रम ठरला. कार्यक्रमचे सूत्र संचालन सोळंकी मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाला शाळा समितीचे सर्व सदस्य, शाळेतील शिक्षक वृंद गोपनारायन सर, कडाळी सर, तेलगोटे मॅडम, सोळंकी मॅडम, ग्रामसेवक जाधव साहेब, ग्रामपचायत सर्व सदस्य, शिपाई मंगलसिंग राजपूत,तलाठी नागे साहेब,अंगणवाडी सेविका, आशा सेविका,गावातील सचिन पवार,संघपाल तायडे, दिपक पवार,बाबुसिंग पवार, राजेंद्र राजपूत,आधारसिंग पवार, राहुल गाडेकर,विलाससिंग पवार,भरतसिंग पवार,शिवसिंग पवार, डॉ तायडे, मिलींद गवारगुरू,संतोषसिंग पवार मंडपवाले यांच्या कडून मोलाचे सहकार्य लाभले,तसेच गावातील बहुसंख्य नागरिक कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Previous article75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विश्वशांती बुद्ध विहार जय भीम नगर वाडेगाव येथे शिव फुले शाहू आंबेडकर या नावाने अभ्यासिका केंद्र सुरू करण्यात आले
Next articleशिवांगी बेकर्स खामगाव येथे क्रिकेट सामने उत्साहात संपन्न..