Home Breaking News रॉयल राजपूत पद्मावती महिला मंडळाच्या हळदी कुंकू कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद..

रॉयल राजपूत पद्मावती महिला मंडळाच्या हळदी कुंकू कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद..

खामगाव:-(अजयसिंह राजपूत) रॉयल राजपूत पद्मावती महिला मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला. संत तुकाराम महाराज मंगल कार्यालय येथे मंगळवारी सायंकाळी हा सोहळा पार पडला. या वेळी महिलांना वाण म्हणून संसरोपयोगी साहित्य देण्यात आले.प्रियाताई राजपूत, ज्योतीताई पवार,रूपालीताई राजपूत,चेतनाताई राजपूत, मायाताई तोमर, ज्योतीताई राजपूत,ऊषाताई राजपूत, श्रद्धा ताई राजपूत, शुभांगीताई वाघ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
प्रमुख पाहुण्या म्हणून राजपूत समाजाच्या महिला उपस्थित होत्या.त्यानंतर महिलांना वाण वाटप करण्यात आले. तत्पूर्वी उखाणे, प्रश्न मंजुषा, गायन आदी स्पर्धाही घेण्यात आली. त्यात सर्व वयोगटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महिलांनी विविध कलागुण सादर केले. त्यात जेष्ठ महिला आणि नव विवाहित महिलांच्या उखाण्यांनी रंगत आणली. उपस्थित महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.खामगाव येथील संत तुकाराम महाराज मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.तसेच सुत्रसंचलन छायाताई चौहान,वनिताताई राजपूत यांनी केले, यावेळी परिसरातील राजपूत समाजाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Previous articleहिंदी विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन
Next article@ निधन वार्ता @