Home Breaking News प्रस्थापित राजकारण्यांचा डाव….!!

प्रस्थापित राजकारण्यांचा डाव….!!

एक तर गेली ४० वर्षे या प्रस्तापित राजकारण्यांनी गरीब मराठ्यांना आरक्षण दिले नाही, त्यांच्या तोंडाला पाने पुसली, सातत्याने खोटी आश्वासने दिली आणि गरीब मराठ्यांची घोर फसवणूक केली आहे….!!
एका बाजूने गरीब मराठ्यांना “जातीसाठी माती खा” असा अघोरी सल्ला देऊन त्यांची मते लाटायची आणि सत्तेवर ठाण मांडून बसायचे त्याचवेळी दुसऱ्या बाजूने त्यांची आरक्षणाच्या संदर्भात घोर फसवणूक करायची हा बनवाबनवीचा खेळ अनेक वर्षे चालला हे वास्तव आता लपून राहिले नाही….!!
निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाची मते लक्षात घेऊन आरक्षण देण्याचा आव आणणारे, तकलादू आरक्षण देऊन गरीब मराठा समाजाची फसवणूक करणारे ढोंगी निजामी मराठे सुद्धा ऊघडे पडले आहेत…!!
आतापर्यंत सत्ताधारी राहिलेले कॉंग्रेस,राष्टवादी कॉंग्रेस,शिवसेना आणि भाजप हे प्रस्थापित राजकीय पक्ष गरीब मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी गंभीर नाहीत हे अनुभवाने सिद्ध झाले आहे….!!
अशावेळी गरीब कुटुंबातून आलेला मराठा आरक्षणासाठी सातत्याने काम करणारा गरीब मराठा माणूस मनोज जरांगे पाटील निष्ठेने, त्यागाची भावना घेऊन स्वतः चा जीव धोक्यात घालून संवैधानिक मार्गाने आंदोलन करून आरक्षण मिळविण्याची लढाई अतिशय निकराने लढतं असेल तर त्या मनोज जरांगे पाटलाच्या आडून पुन्हा एकदा श्रेय घेण्याचा प्रयत्न इथल्या राजकीय प्रस्थापित नेत्यांनी केलाच….!!
आपणं चालवित असलेल्या फसवणूक तंत्रात गरीब मराठ्यांनी स्वीकारलेला गरीबांचा,गरीब नेता मनोज जरांगे पाटील अडकत नाही ही मोठी समस्या निर्माण झाली आहे आणि या आंदोलनातून गरीबांचा नेता तयार झाला तर आपल्या साम्राज्याला धोका निर्माण होईल ही भिती निजामी मराठ्यांना सतावत आहे….!!
मनोज जरांगे पाटील आपल्या फसवणूक तंत्रात अडकत नाही म्हणून आता सत्ताधारी आणि प्रस्थापित राजकीय पुढारी मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करण्यासाठी पुढे सरसावले आहेत…!!
सगळ्या राजकीय पक्षातील निजामी मराठे, प्रस्थापित सत्ताधारी यांना मनोज जरांगे पाटील नको आहेत, कारण तो गरीब कुटुंबातून आला आहे आणि गरीब मराठ्यांच प्रामाणिक नेतृत्व करतोय…!!
आणि म्हणून पैसा आणि सत्तेच्या जोरावर आंदोलनातील मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी फोडून त्यांच्या सहका-यांच्या तोंडून मनोज जरांगे पाटील यांच्या बदनामी चा अंक सुरू केला आहे….!!
या पुढील अंकात हातात असलेल्या सत्तेचा वापर करून मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करणे, नामोहरम करणे,दंडात्मक कार्यवाही चा बढगा ऊगारणे असे प्रयत्न केल्या जातील.आणि त्यांच्या मध्ये नेतृत्व गुण नाहीत हे सिद्ध करण्यासाठी अनेक हातखंडे वापरून त्यांच्या व्यक्तीगत जीवनातील घटनांचा संदर्भ दिला जाईल…!!
प्रस्थापित सत्ताधारी सत्तेत टिकून का राहतात.? या प्रश्नाचे उत्तर वरील घडामोडीत सापडते.
गरीब कुटुंबातून आलेला नेतृत्व करणारा माणूस तो कुठल्याही जातीतील असो किंवा फुले शाहू आंबेडकर विचारधारा मानणारा नेतृत्व करणारा माणूस असो, तसेच अल्पसंख्याक समुहातील धडपड्या असो इथल्या प्रस्थापित सत्ताधारी वर्गाला तो आपल्या सत्तेतील अडथळा वाटतोय आणि म्हणून प्रस्थापित सत्ताधारी त्याला कुठल्या तरी डावात अडकवून संपवितात हा प्रस्थापित सत्ताधाऱ्यांच्या षढयंत्राचा भाग आहे….!!
मनोज जरांगे पाटील मराठा जरी असले तरी त्यांना निजामी मराठे संपविण्यासाठी एकत्र येऊन काम करतील यात तिळमात्र शंका नाही….!!
सर्व उपेक्षितांनी, भटके विमुक्त,दलित आदिवासी, अल्पसंख्याक, ओबीसी आणि घराणेशाही बाहेरील गरीब मराठ्यांनी प्रस्थापित सत्ताधारी वर्गाचा हा जीवघेणा खेळ समजून घेतला पाहिजे….!!
जयभीम.
@.. भास्कर भोजने.:-9960241375

Previous articleप्रगतशील शेतकरी सदानंद ढगे यांची सह्याद्री दुरदर्शन वाहीणीवर मुलाखत.
Next articleहिंदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा