Home Breaking News कॉंग्रेस च्या पाठिंब्यावर मोदी प्रधानमंत्री….!!

कॉंग्रेस च्या पाठिंब्यावर मोदी प्रधानमंत्री….!!

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. त्या निकालातून जे सत्य समोर आले आहे ते सत्य इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडिया भारतीय जनतेला सांगणार नाही….!!
सवर्णांच्या राजकीय डावपेचातील “अंदर की, राज की बात” बाहेर येणार नाही याची खबरदारी सवर्णांचा मिडिया घेत असतो….!!

सत्य असे आहे की, कॉंग्रेस पक्षाच्या पाठिंब्याने मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनले आहेत….!!

भाजपला देशात २४२ जागा मिळाल्या आणि एनडीए ला २९४ जागा मिळाल्या. बहुमतासाठी २७२ चा आकडा पाहिजे. बहुमतापेक्षा २२ जागा एनडीए ला जास्त मिळाल्या. आणि म्हणून मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले असा साळसूद प्रचार केला जातो…!!
मोदीला किंवा भाजपला सत्तेत बसवण्यासाठी नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना सुद्धा जबाबदार धरले जाते आहे परंतु वास्तव असे आहे की. भाजपला ज्या २४२ जागा मिळाल्या त्या कशा आणि कुणाशी लढून मिळाल्या त्याचा अभ्यास केला तर स्पष्टपणे जाणवते की, इतर प्रादेशिक पक्षांनी इमानेइतबारे भाजपला पराभूत करण्यासाठी जीवतोड मेहनत केली आणि भाजपला रोखले हे सत्य आहे. मात्र कॉंग्रेस पक्षाने भाजपला रोखण्यासाठी प्रयत्न तर केले नाहीच, ऊलटं निवडून येण्यासाठी मदत केली. आणि म्हणून भाजप २४२ जागेपर्यंत मजल मारु शकला हे वास्तव आहे,सत्य आहे, आरोप नाही…!!

कॉंग्रेस पक्षाने २०२४ ची लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढली असती तर ते ठळकपणे अधोरेखित झाले असते परंतु कॉंग्रेस पक्षाने इंडिया आघाडीच्या बॅनरवर प्रादेशिक पक्षांना सोबतं घेऊन २०२४ ची लोकसभा निवडणूक लढविली आणि आपल्या मित्राला भाजपला छूपी मदत केली, अर्थात भाजपची बी टीम म्हणून रोल अदा केला…!!

छत्तीसगढ, मध्यप्रदेश आणि गुजरात या तीन राज्यात एकुण ६६ लोकसभेच्या जागा आहेत.त्या तिन्ही राज्यात सरळ सरळ भाजप आणि कॉंग्रेस पक्षात लढतं होती. तिथं कोणताही प्रादेशिक पक्ष लढतं नव्हता. म्हणजे मत विभाजनाचा प्रश्नच नव्हता अशा वेळी कॉंग्रेस पक्षाने सपशेल हाराकिरी केली. भाजपला निवडून येण्यासाठी मदतच केली. ६६ पैकी भाजपला ६४ आणि कॉंग्रेस पक्षाला केवळ २ जागा मिळाल्या हे वास्तव आहे. जर, तर चा तर्क नाही. आरोप नाही…!!

२०२४ च्या भाजपच्या आणि एनडीए च्या आकड्यांमधून ६६ जागा वजा करा, भाजप किंवा मोदी यांना सत्तेत बसण्याची कोणतीच संधी नाही….!!

कॉंग्रेस पक्ष भाजपला मदत करीत आहे याचे पुरावे निवडणुकी पुर्वीच मिळाले होते. गुजरात मधील सुरत लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराने अर्ज मागे घेऊन भाजपला बिनविरोध निवडून देण्याचे उदाहरण ताजे आहे. तसेच मध्यप्रदेश मधील एका लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराने ऐनवेळी माघार घेऊन भाजपला बिनविरोध निवडून येण्यासाठी मदत केली होती हेही उदाहरण ताजे आहे…!!

संपूर्ण देशात भाजप विरोधी लाट होती, मग छत्तीसगढ, गुजरात आणि मध्यप्रदेश मध्ये तशी लाट नव्हती का.? या प्रश्नाचे उत्तर बी टीम म्हणून प्रादेशिक पक्षांवर आरोप लावणा-या कॉंग्रेस पक्षाच्या दुटप्पी नेत्यांनी दिले पाहिजे…!!

संविधान वाचवण्याची भाषा करणा-या कॉंग्रेस पक्षाला या तिन्ही राज्यात भाजप सोबतं लढण्यापासुन कुणी रोखले होते..?? या तिन्ही राज्यात संविधानाला माननारा मतदार नाही का.??

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम म्हणून भाजपला ऊतरती कळा लागली असे बोंबलून बोंबलून सांगणा-या सवर्ण पत्रकारांना विचारले पाहिजे की, छत्तीसगढ, गुजरात आणि मध्यप्रदेश मध्ये भारत जोडो यात्रा पोहचली नाही का.?? भारत जोडो यात्रेचा परिणाम देशभर दिसतो मात्र या तीन राज्यात का दिसतं नाही..??

कॉंग्रेस पक्षाने ज्या तीन राज्यात भाजप सोबतं लढायला पाहिजे होते तिथं त्यांनी नांगी टाकली, त्याची कारणे ऊघडं आहेत, रॉबर्ट वड्रा यांना हरियाणा मधील जमीन आणि अवैध संपत्ती च्या प्रकरणा मधून मोकळे व्हायचे आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना हेरॉल्ड प्रकरणातून मुक्तता हवी आहे…!!
गरीबाने केलं तर लफडं मात्र सवर्णांनी केलं तर प्रेम अगदी तोच न्याय इथंही आहे, दलित, मुस्लिम, ओबीसी नेतृत्व असलेल्या पक्षांनी निवडणूक लढवली आणि भाजप निवडून आला तर बी टीम मात्र भाजप सोबतं कॉंग्रेस लढली आणि भाजप निवडून आला तर कॉंग्रेस बी टीम का ठरतं नाही.???
कॉंग्रेस पक्षाने इंडिया आघाडी ऊभी करणा-या नितिश कुमार यांना जाणिवपूर्वक इंडिया आघाडीतून बाहेर घालविले, असे नितिश कुमार यांनी स्वतः स्पष्ट केले आहे.आणि म्हणून बिहार मध्ये इंडिया आघाडी कमजोर झाली….!!
इथंही कॉंग्रेस भाजपची बी टीम म्हणून काम करीत होते हेच सिद्ध होते….!!
पं. बंगाल मध्ये इंडिया आघाडी मधील घटक पक्ष तृणमूल कॉंग्रेस विरोधात कॉंग्रेस पक्षाने निवडणूक लढवून भाजप ची बी टीम म्हणून काम केले आहे हेच सिद्ध होते…!!

दिल्ली मध्ये इंडिया आघाडी मधील घटक पक्ष आप च्या विरोधात कॉंग्रेस पक्षाने निवडणूक लढवून सातही जागेवर भाजप ला निवडून येण्यासाठी मदत केली. इथंही कॉंग्रेस पक्षाने भाजप ची बी टीम म्हणून काम केले हेच सिद्ध होते…!!

डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे कॉंग्रेस जळतं घरं आहे…!!

मा. कांशीराम म्हणायचे भाजप आणि कॉंग्रेस नागनाथ, सापनाथ आहेत…!!

विरोधी पक्षांतील बहूतेक बहूजन नेते म्हणतात भाजप आणि कॉंग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत…!!

आपले पुर्वज मार्गदाते अनुभवी प्रगल्भ राजकीय नेते आणि तज्ञांचे अभिप्राय नजरेआड करुन महाराष्ट्रातील आंबेडकरी विचारवंत कॉंग्रेस पक्षाला मतदान करा म्हणून फतवा काढतात तो फतवा खरचं योग्य होता का.??
आत्मचिंतन केले पाहिजे…!!

जयभीम.
@.. भास्कर भोजने.

Previous articleशेतकऱ्यांच्या पसंतीचे कपाशी बियाणे मिळेना!
Next articleलोकसभा निवडणुक २०२४ एक परामर्श