शेगाव* “यादे हुसैन” मोहरम निमित्त शेगाव शहरातील आरोग्य सेवक मोहम्मद सलमान मित्र मंडळ व वंचित बहुजन आघाडी शेगाव शहेर तर्फे १५व १६ जुलै रोजी सईबाई मोठे उपजिल्हा सामान्य रूग्णालयात भव्य नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून दोन दिवसात १३६ रूग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी १२ रुग्णांची दिनांक १९ जुलै ला शस्त्रक्रिया करण्यात येणार असून सहारा नेत्र क्लिनिक डॉ. दाऊद दिवाणी यांच्या दवाखान्यात १५६ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यात ५५ रुग्णांना चष्मे असल्याचे आढळून आले असून, त्यांना १९ जुलै रोजी मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत मोफत चष्मा,व शस्त्रक्रिया ही मोफत केले जाईल.
मोहम्मद सलमान राजकारणासोबतच समाजकारणात नेहमीच सक्रिय असतो. मोहम्मद सलमान नेहमीच समाजासाठी काहीतरी करण्याची प्रयत्न करत असतो असंच कामामुळे मोहम्मद सलमान यांची शेगाव शहरात कौतुक होत आहे, शिबिरात एडवोकेट मोबिन शेख युवा शहर अध्यक्ष संदेश शेगोकार आरोग्यसेवक मोहम्मद सलमान मित्र मंडळ चे सर्व सदस्य व वंचित बहुजन आघाडी शेगाव शहर चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते