मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 24 में 2025
हिमायतनगर तालुक्यात सतत गेले चार दिवसांपासुन अवकाळी पाऊस पडत आहे. शेतक-यांना शेताची मशागत करण्यासाठी उन्हाळ्यात जमीनीची नांगरणी,वखरणी , शेणखत टाकणे, रोटावेटर करुन , हळदीचे बेड मारणे आदी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत असतो. पण अवकाळी पावसामुळे वरील कामांना ब्रेक लागला आहे. जमीन पुरेशी तापत नाही, जमीनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढत असल्याने पुढील दोन महिन्यांत जमीनीत बुरशीचे प्रमाण वाढुन त्याचा फटका पिकांना बसणार आहे. हे मात्र निश्चित आहे.
कृषी निविष्ठा बाजारातुन ट्रॅक्टरने शेताकडे नेण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.
जमीनीची वखरणी केल्यास जमीनीचा सुपीक भागाची उलथापालथ होते. जमीनीच्या भुर्भातील पिकांना पोषक अन्नद्रव्ये हे पिकांना मिळतात. त्यामुळे उत्पादनात वाढ होण्याची दाट शक्यता असते..मात्र अवकाळी पावसामुळे शेतक-यांना नाहक गोष्टींना सामोरे जाण्याची वेळ येते आहे.