हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज
मो. नंबर – 8983319070
नाशिक -भटके व विमुक्त समाजाचे स्वातंत्र्यासाठी आणि राष्ट्र उभारणीसाठी अपुर्व योगदान लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने प्रथमच ३१ ऑगस्ट हा दिवस भटके व विमुक्त दिन म्हणून साजरा करण्याची मान्यता दिली आहे.त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी भटके व विमुक्त आघाडी च्यावतीने जिल्हाधिकारी जलद शर्मा यांची भेट घेऊन ३१ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्या बाबत चर्चा केली.
सन १८७१मध्ये ब्रिटिश सरकारने “क्रिमिनल ट्राईब्ज ऍक्ट” अंतर्गत काही जातींना गुन्हेगारी जाती म्हणून घोषित केले त्यामुळे या जातींतील समाज बांधवांना स्वातंत्र्यपूर्व काळात अमानुष अत्याचार सहन करावा लागला, स्वातंत्र्यानंतही मुख्य प्रवाहापासून दूर राहिला ने भटके व विमुक्त जाती जमातीच्या समाजाला न्यायासाठी विलंब झाल्याने पर्यायाने याचे दीर्घकाली सामाजिक परिणाम या समाजावर झाले, स्वातंत्र्यानंतर 31 ऑगस्ट 1952 रोजी क्रिमिनल ट्राईब्ज ऍक्ट हा कायदा रद्द करण्यात आला, आणि या जातींना विमुक्त म्हणून घोषित करण्यात आले, महाराष्ट्र शासनाने
31 ऑगस्ट हा दिवस भटके व विमुक्त दिन* साजरा करण्याचा निर्णय घेतल्याने भारतीय जनता पार्टी भट्टीविमुक्त आघाडीच्या वतीने शासनाचे मनःपूर्वक अभिनंदन केले, तसेच नाशिक शहरा सह जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून, यासाठी शासनाने योग्य ते सहकार्य करावे अशा आशयाचे निवेदन भटके व विमुक्त आघाडीचे महानगर संयोजक सिध्देश्वर बापु शिंदे, गुलाब सय्यद, अरुण राठोड,हेमंत शिंदे, आबासाहेब टरफले,मयुर गवूळ, कृष्णा जाधव, नितीन कामडी, रामदास देवरगावकर, शरद जाधव,नाना धुमाळ आदी दिले .



