Home Breaking News लोहारा गावातील मुख्य रस्ताला खड्डे व अतिक्रमाचे जाळे , प्रशासन सुस्त 

लोहारा गावातील मुख्य रस्ताला खड्डे व अतिक्रमाचे जाळे , प्रशासन सुस्त 

संतोष मोरे

बाळापूर:- अकोला जिल्ह्य़ातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा फाटा ते जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळे पर्यंत रस्त्याला गटाराचं स्वरुप व अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे . प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना व शाळेतील विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन गावापासून ते लोहारा फाटा पर्यंत प्रवास करावा लागतो. या रस्ता कडे कोणतेच अधिकारी लक्ष देणास तयार नसल्याचे येथील सुदंन नागरिकांचे म्हणणे आहे.गावातील मुख्य रस्त्यावर गटारे तुंबल्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. रस्त्यात पडलेल्या मोठमोठ्या खड्यांमुळे व खड्यात साचत असलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे रस्त्याला अक्षरश पानंदीचे स्वरूप आले आहे. याला रस्ता म्हणावा का काय असा प्रश्न या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना, प्रवाशांना व वाहनधारकांना पडत आहे. लोहारा येथे मुख्य ठिकाणी बाजार भरतो. त्यामुळे ,

शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी, कर्मचारी, गावातील नागरिक कामगार, व्यावसायिक या सर्वांची या रस्त्यावर मोठी वर्दळ असते गाडी चालविताना चालक यांना विचार पडतो कोणता खड्डा वाचवा कोणतानाही येवढे मोठे खड्डे पडलेले आहेत. सांडपाण्याच्या दुर्गंधीयुक्त वासामुळे व डासांच्या प्रभावामुळे रोगराई पसरण्याची त्याचबरोबर रस्त्यात पडलेल्या – मोठमोठ्या खड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्यात पडलेले मोठमोठे खड्डे बुजवावेत नाहीतर नवीन रस्ता बांधुन द्यावे नालीचे बांधकाम करण्यात यावी,

अशी मागणी वाहनधारकांसह प्रवासी व नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. गावातून हा एकमेव मार्ग फाट्यावरती जातो. त्यामुळे विद्यार्थीना मोठी कसरत करावी लागते तरी यांकडे संबधीत अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रस्ताचे काम पुर्ण करावा अशी मागणी गावातील नागरिक व विद्यार्थी वर्ग करीत आहेत.

Previous articleसंत तुकारामांचे नाव थोर व्यक्तींच्या यादीतून वगळल्याने संत समुदाय संतप्त
Next article“आदर्श ज्ञानपीठाची” शैक्षणिक, मनोरंजनात्मक, आणि अभ्यासात्मक सहल यशस्वी..