Home Breaking News होळकर राजघराण्याचे वंशज भूषण सिंह राजे होळकर करणार नांदूर मध्यमेश्वर होळकर वाड्याचा...

होळकर राजघराण्याचे वंशज भूषण सिंह राजे होळकर करणार नांदूर मध्यमेश्वर होळकर वाड्याचा दौरा 

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर – 8983319070

(निफाड )नांदूर मधमेश्वर येथील अहिल्यादेवी होळकरc यांनी बांधलेला खाजगीचा होळकर वाडा हा काही दिवसांपूर्वी विकास कामांच्या नावाखाली जमीनदोस्त करण्यात आला परंतु हा जमीन दोस्त करत असताना कुठल्याही प्रकारे सामाजिक बांधिलकी जपण्यात आली नाही असा आरोप ग्रामस्थ व विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आणि ह्याच कारणाने नांदूर मध्यमेश्वर येथील अहिल्यादेवी होळकर यांचा वाडा पाडल्यानंतर सामाजिक राजकीय ऐतिहासिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या नांदूर मध्यमेश्वर होळकर वाड्याला भेट देऊन तो वाडा पाडल्या संदर्भात निषेध व्यक्त केला आणि प्रखर जनभावनात त्यातून उमटून आल्या अनेक लोकप्रतिनिधींनी दोशींवर कारवाई साठी सरकारला इशारे दिले यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समितीचे समाधान बागल यांनी प्रखर भूमिका मांडल्या व सदर मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांचा वाडा हा फक्त दगड विटांचा वाडा नसून ते विचारांचे मंदिर आहे ते एक सामाजिक बांधिलकी जपणार भवन आहे आणि मातोश्री अहिल्यादेवींचा वारसा सांगणार आमचे शक्ती स्थान आहे अशा स्वरूपात या वाड्याचे वर्णन केलं होतं आणि आता ह्याच वाड्याला भेट देण्यासाठी होळकर राजघराण्याची वंशज भूषण सिंह राजे होळकर हे येत्या सोमवारी येणार असून त्यांच्या या दौऱ्याकडे सामाजिक राजकीय व ऐतिहासिक क्षेत्रातील सर्वच मान्यवरांचे लक्ष लागलेलं आहे भूषण सिंह राजे यांनी याआधीही प्रसिद्धी माध्यमां समोर व सोशल मीडिया द्वारे आपल्या भावना व्यक्त केलेल्या असून हा वाडा होळकरांचाच आहे या मताशी ते ठाम आहेत आणि म्हणून नांदूर मध्यमेश्वर येथे होत असलेल्या भूषण सिंह राजे होळकर यांचा पाहणी दौरा हा लक्षवेधी ठरेल असे सर्व स्तरातून म्हटले जात आहे या दौऱ्यानंतर भूषण सिंह राजे होळकर यांच्या भावना जाणून घेण्यासाठी गावकरी व सर्वच जनसामान्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली आहे

 

 

Previous articleनिधन वार्ता
Next articleहिमायतनगर तालुका कृषि कार्यालयात मंडळ कृषि अधिकारी सिडाम पदोन्नतीवर रूजु.