
👉 शेतक-यांची एकमुखी मागणी
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 12 मार्च 2026
या अधिवेशनात राज्यसरकारने शेतक-यांची दोन लाखांपर्यंत कर्जमाफी केली खरी, पण कर्जमाफीसाठी शेतकरी कसे पात्र ठरतील यांचे निकष अजुन गुलदत्सातच आहेत..निसर्गचा लहरीपणा कधी अतिवृष्ठी, कधी दुष्काळ, नापिकी, शेतमालाचे पडलेले भाव आधी बाबींमुळे शेतकरी यावर्षी कमालीचे अडचणीत सापडले आहेत. शेतक-यांचे दोन लाख रूपयां प्रयंतचे पिककर्ज राज्यसरकारने माफ केले असले तरी कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी राज्यशासन काय निकष, अटी, नियम लावेल याकडे शेतक-यांचे लक्ष लागले आहे..तिस मार्च पुर्वी ते निकष असतील ते जाहीर करावेत अशी मागणी करीत आहेत..
शेतीवरील निविष्ठा, ट्क्टरखर्च मजुरी यामुळे प्रचंड महागाई वाढली असुन, शेती करणे परवडत नाही असे जाणकार शेतकरी बोलुन दाखवित आहेत..शेतक-यांचा शेतमाल सध्या कवडीमोल भावाने व्यापारी खरेदी करत असुन, शेतीवर केलेला खर्च निघतो का? नाही अशा व्दिदा मनस्थीतीत शेतकरी आहेत..
पिक विमा लवकरात मिळावा, घरकुलाचे हप्ते, सिंचन विहिरीचे बांधकामांचे बिल, रमाई घरकुल योजना, पि.एम किसान सन्मान निधी अश्या विविध योजनेचे पैसे आजतागायत पडले नसुन ते लवकरात लवकर मिळावेत. त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचे निकष राज्यसरकारने जाहीर करुन शेतक-यांना दिलासा द्यावा. अशी मागणी जोर धरत आहे..




