Home Breaking News विद्यार्थ्याने अभ्यासात जिद्द, चिकाटी आणी सातत्य ठेवल्यास यश निश्चीत मिळते.

विद्यार्थ्याने अभ्यासात जिद्द, चिकाटी आणी सातत्य ठेवल्यास यश निश्चीत मिळते.

👉 *गटशिक्षणाधिकारी केशव मेकाले यांचे प्रतिपादन

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक, नांदेड दिनांक- 18 मार्च 2026

पि.एमश्री नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सन 2025-2026 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत मौजे सवना ज. येथील *जिल्हा परीषद केंद्रीय प्राथमिक शाळा सवना ज. येथील होतकरु विदयार्थी *सुरज रुख्मीनी देविदास अनगुलवार* हा नांदेड जिल्ह्यातुन *तिसरा* क्रमांकाने *97.50%* गुण घेऊन उतिर्ण झाला आहे..

त्याच्या यशाबद्दल हिमायतनगर पंचायत समिती येथील गटशिक्षणाधिकारी केशवराव मेकाले यांच्या उपस्थीत आयोजित कार्यक्रमात सुरजसह त्यांच्या कुंटुबियासहित विशेष अभिनंदन करण्यात आले आहे. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मेकाले साहेब म्हणाले विद्यार्थ्यानी शालेय जिवनात नियमीत आपला अभ्यास करत असतांना त्याचबरोबर स्पर्धा परिक्षेसशमध्ये जिद्द, चिकाटी आणी सातत्य ठेवल्यास, आपल्या ध्येय आणी उदिष्ठे साध्य करता येतात. सुरजच्या या यशाने हिमायतनगर तालुक्यातील अनेक शाळांना विशेष प्रेरणा मिळणार असल्याचे ते यावेळी म्हणाले…

Previous articleरमजानसाठी बाळापूर बाजारपेठ सज्ज
Next articleहाता ते कारंजा रमजानपुर रोड दुरुस्ती व डांबरीकरण साठी