Home Breaking News रस्त्यावरील खड्ड्यामुळे ऐन_परीक्षेच्या काळात मानव विकासची बस सेवा बंद.

रस्त्यावरील खड्ड्यामुळे ऐन_परीक्षेच्या काळात मानव विकासची बस सेवा बंद.

👉 मॅडम आम्हाला शिकायचं आहे. विद्यार्थ्यांची आर्त हाक!

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक -26 मार्च 2024

हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरंजनी रस्त्यावर खड्डे पडल्याने येथील विद्यार्थिनींनी घेतली तहसील कार्यालयात धाव.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरंजनी, एकंबा, कोठा, कोठा तांडा, शेलोडा, सिरपल्ली या ग्रामीण भागातुन मोठ्या संख्येने मुली माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी एस टी महामंडळ व मानव विकास त्यांच्या माध्यमातून मुलीच्या शिक्षणासाठी एसटी बसची सुविधा शासनामार्फत करण्यात आलेली असतात.परंतु सध्या हा रस्ता मृत्यूचा सापळा बनल्याने ह्या रस्त्याने बस टाकण्यास चालक गाडी चालवण्यासाठी भीतीदायक रस्ता झालेला आहे ऐन परीक्षेच्या दिवस असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी चिंताग्रस्त आहेत.
हिमायतनगर शहरातून अरुंद रस्ते असल्याने महामंडळ ची बस परमेश्वर मंदिर ते आय टी आय कॉलेज पासून सिरंजनी रोड या मार्गे सुरु आहे. मागील काही वर्षांपासून हा रस्ता पावसाच्या पाण्यामुळे, उसाच्या व शेतमालाच्या वाहतूकीमुळे पुरता खचून गेला आहे. या संदर्भात सिरंजनीवासी व भागातील नागरिकांनी शासन दरबारी वेळोवेळी सदरील रस्ता दुरुस्तीसाठी पाठपुरावा केलेला आहे.
शासनाला हा रस्ता दुरुस्ती करण्यासंदर्भात आजपर्यंत जाग सुद्धा आलेली नाही म्हणून सिरंजनी चे कार्यक्षम महिला सरपंच यांनी लोकसहभागातून गेले वर्षी पावसाळ्यात मुरूम टाकून तात्पुरती दुरुस्ती केली होती. तत्कालीन तहसीलदार श्री आदित्य शेंडे साहेब यांनी नायब तहसीलदार श्री ताडेवाड साहेब यांना पाठवून रस्त्याची स्थिती जाणून घेवून संबंधित विभागाकडून लवकरात लवकर उपाय योजना करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्येक्ष कार्यवाही काहीच झाली नाही..
तहसीलदार पदाची नव्याने सूत्र हाती घेतलेल्या श्रीमती पल्लवी टेमकर मॅडम ह्या कर्तृत्ववाण आणि कार्यतत्पर अधिकारी म्हणून परिचित आहेत. आज सिरंजनी येथील विद्यार्थीनी सरपंच प्रतिनिधी श्री पवन करेवाड यांच्या माध्यमातून तहसीलदार मॅडम यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हाचे आशिष सकवान, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष राम सुर्यवंशी सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड जेष्ठ समाज सेवक दशरथ गोसलवाड, भारत शिलेवाड, हनुमंत कोरडे यांच्यासह त्या परिसरातील 60-70 विद्यार्थीनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते…
*निवेदनाचे तात्काळ दखल घेऊन श्रीमती तहसीलदार मॅडम यांनी तात्काळ हिमायतनगर मंडळाचे मंडळ अधिकारी श्री चव्हाण साहेब तलाठी सचिन जवडकर यांनी तात्काळ सदरील रस्त्यावर येऊन पाहणी केली व मॅडम यांच्या कडून रस्ता दुरुस्ती संदर्भात योग्य तो पाठपुरावा केल्या जाईल असे सुद्धा त्यांनी या वेळेस सांगितले….!*

*#हिमायतनगर तालुक्यातील #सिरंजनी येथील बायपास #रस्त्यावर एक-दोन ठिकाणी #मोठे_खड्डे पडल्यामुळे #मानव विकासची #बस बंद झाली असल्या मुळे परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थिनीला #अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे आज तहसीलदार यांना #सरपंच_प्रतिनिधी यांचा कडून निवेदन करून अडचणी दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे त्यावेळी गावातील नागरिक विद्यार्थी उपस्थित होते…!*

Previous articleमराठा नेते मोदी, शहा व फडणवीस चे गुलाम का झाले हा लेख सर्व मराठा बहुजनांनी समजून घ्यावे, महाराष्ट्रातील मराठे ब्राह्मणाच्या पितृछायेत का गेली?
Next articleविहिरीत आढळून आला महिलेचा मृतदेह वाडेगाव येथील घटना