Home Breaking News हाता ते कारंजा रमजानपुर रोड दुरुस्ती व डांबरीकरण साठी 

हाता ते कारंजा रमजानपुर रोड दुरुस्ती व डांबरीकरण साठी 

हाता वासीयानी केला रस्ता रोको

संतोष मोरे बाळापूर :- अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम आज  

हाता ते कारंजा रमजानपुर रोड दुरुस्ती व डांबरीकरण हाता येथील नागरिक एकत्र येऊन रस्ता रोको आंदोलन केले .हाता ते कारंजा रमजानपुर रस्ता हा अर्धवट केला असुन केंद्रीय रस्ते महामार्ग अंतर्गत मंजूर असताना गावापासून झिरो वरुन किलोमीटरहून असणाऱ्या व मा खासदार ह्यांचे लोकसभा क्षेत्रात येत असल्याने हाता ते कारंजा रोड राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असताना अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ह्या मुद्याचे उठाव करण्यात आला होता. असे असताना हाता कारंजा रमजान पुर रोडचे अर्धवट काम करुन गेली दोन वर्षांपासून रस्ता पूर्णपणे खराब होऊन गावातील शेकडो विद्यार्थी व्यापारी तसेच नागरिक प्रवासी रोज

गावाबाहेर पडुन प्रवास करतात

प्रवास करीत असताना खुप जिकरीचे झाले असून बरेच दा अपघात झाले असून कित्येक जण गंभीर जखमी झाले व हात पाय व मणक्याचे आजाराने ग्रस्त होऊन त्रास सहन करावा लागतो

तर रस्ता खराब आहे म्हणून परिवहन महामंडळाच्या बसेस सुध्दा वेळी वेळी बंद करण्यात येतात त्यामुळे विदयार्थी ह्यांचे शैक्षणिक नुकसान होते असुन रस्ता म्हणजे प्रगती चे लक्षण संबोधले जाते. तरी गावातील नागरिक ह्यांनी संबंधित विभागाला वेळोवेळी तक्रार वा निवेदन सादर केले मात्र शासन प्रशासन ने रोड चे कामाबाबत कोणत्याही प्रकारची काळजी केली नाही

परिणामी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हाता फाटा येथे रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आले

रस्ता रोको मध्ये संजय बावणे माजी जिल्हा परिषद सदस्य

किशोर कुचके सरपंच पती

श्याम मनसुटे माजी सरपंच पती

विजय धर्माळे शिवसेना नेते गजानन सुलताने

भिमकिरण दामोदर रवी क्षिरसागर

विजय दामोदर गजानन देऊळकर गजानन नंदाने व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते

सार्वजनिक बांधकाम उपविभाग २ अकोला चे कनिष्ठ अभियंता पलाश भोयर ह्यांनी रोडचे कामा बाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन रोडचे कामाबाबत उपाय योजना करणेबाबत पत्र दिल्यानंतर रस्ता रोको थांबविण्यात आला

रस्ता रोको आंदोलन स्थळी उरळ पोलीस स्टेशन चे कायदे सर भोजने मेजर व त्यांचे कर्मचारी व लेडी पोलीस सह चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. ‌‌. ‌.

Previous articleविद्यार्थ्याने अभ्यासात जिद्द, चिकाटी आणी सातत्य ठेवल्यास यश निश्चीत मिळते.
Next article********अनुसूचित जाती उपवर्गिकरण खरंच न्याय देऊ शकेल का?*