Home Breaking News नाशिक महानगरपालिकेच पुन्हा ” आंधळ दळतय अन कुत्र पीठ खातय ” असं...

नाशिक महानगरपालिकेच पुन्हा ” आंधळ दळतय अन कुत्र पीठ खातय ” असं गोदापात्राच्या कामांच्या बाबतीत होणार का?

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर – 8983319070

नाशिक मध्ये सध्या पंचवटी मधील दहिपुला शेजारील गोदावरी पात्रातील खोली वाढावण्याच्या कामी गोदा पात्रातील दगडी भुस्थर बुलडो झर लावून काढण्याचे काम चालू आहे. मागच्या वर्षी देखील गोदापात्र स्वच्छ करण्याच्या नावाखाली वाळुच उत्खनन मोठया प्रमाणावर करून काही माफियांनी मोठया प्रमाणावर आर्थिक लुट केली होती, ती सुध्दा डोळ्यावर झापडं लावलेल्या नाशिक महानगर पालिकेच्या डोळ्या देखत. “आंधळ दळतय अन कुत्र पीठ खाताय ” या म्हणीचा प्रत्यय नाशिक मनपाने नाशिककर जनतेला दाखवून दिला होता.

इतके सारे गैरप्रकार होवुन सुद्धा महानगर पालिका यातून काही बोध घेत नसल्याचे दिसून येत आहे. कारण हे काम महानगर पालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येत आहे का? का कुठला ठेकेदार नेमून करण्यात येत आहे या बाबतीत नागरीकांना माहिती व्हावी म्हणून कामाच्या बाबतीत माहिती देणारा फलक लावून त्याद्वारे नागरिकांना माहिती होणे गरजेचे असताना असा फलक लावल्याचे कुठेही दिसून येत नाही.

मागील वर्षी असेच गोदा स्वच्छतेच्या नावाखाली अवैध वाळू उत्खनन करून त्याची वाहतूक करून आर्थिक लुटीच्या कामाच्या प्रकरणाचा एक व्हिडिओ मी काम चालू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी बनवून सोशल मीडियावर टाकून त्या द्वारे जाब विचारला होता. त्यानंतर आठ दिवसांनी स्थानिक वर्तमानपत्रे यांना जाग आली व tyani” गोदापात्रातील वाळुवर डल्ला ” या मथळ्या खाली या अवैध प्रकरणाची दखल घेऊन बातम्या दिल्या. पण तोपर्यंत गोदापात्रातील शेकडो ब्रास वाळूची तीन चार ठिकाणा वरून चोरी होऊन गोदापात्राची पर्यायाने पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली होती.

आज जे काम चालू आहे त्यामध्ये दगडी भुस्तर बुलडोझर द्वारे फोडून मोठ्या प्रमाणावर दगड बाहेर काढले जात आहे. या मध्ये या कामाची शासनाकडे रॉयल्टी भरली आहे का? किती फुट उत्खनन केले जाणार आहे? याची माहिती करदात्या नाशिककर नागरीकांना कळणे त्यांचा हक्क आहे. नाही तर मागच्या वेळी वाळूची चोरी झाली होती यावेळी दगडांची चोरी व्हाय ची व माफिया आर्थिक लुट करणार अन गोदामायच्या नशि बी पर्यावरणीय हानी येणार व नाशिक महानगर पालिकेचा पुन्हा ” आंधळं दळतय अन कुत्रं पीठ खांतय ” कारभाराचा प्रत्यय नाशिककर जनतेच्या नशिबी प्रशासकिय राजवट जावून लोकप्रतिनिधीची लोकशाही राजवट आलेल्या कार्यकाळात कायम राहणार.

Previous articleशेगाव तालुक्यातील निंबी गावात स्मशानभूमी नाही अंत्यसंस्कारासाठी जाण्यासाठी रस्ताही नाही गावकऱ्यांची मोठी कसरत.
Next article* भोंदू बाबांच्या नवं नव्या प्रकरणातून काय शिकावे..??