Home Breaking News जिल्हयात सर्वत्र भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी..

जिल्हयात सर्वत्र भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी..

जिल्हा संपादक, नांदेड दिनांक- 15 एप्रिल 2026

नांदेड जिल्हयासह हिमायतनगर तालुक्यात तहसिल,पंचायत समिती, कृषि कार्यालय, भुमीअभिलेख, सार्वजनीक बांधकाम विभाग, महावितरण कार्यालय, सामाजिक वनीकरण विभाग यासह ग्रामीण, शहरी भागात भारतीय राज्यसंघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन, अभिवादन करण्यात आले. यावेळी ध्वजारोहन करुन ढोल ताश्याच्या गजरात फटाक्याच्या आतषबाजी करत रॅलीचे आयोजन करण्यात आले..या कार्यक्रमाला हिमायतनगचे नगराध्यक्ष रफिकसेठ यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन, अभिवादन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष, बालकांची उपस्थीती होती.

Previous article*नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के* 
Next articleजय भिम च्या घोषणांनी लोहारा परिसर दुमदुमला