मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 25 एप्रिल 2026
हिमायतनगर तालुक्यात लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. शेतकरी राजा शेतीतील हळद, ज्वारी , तिळ, भुईमुग काढण्याच्या कामात व्यस्त असुन, टॅक्ट्ररने शेतीच्या मशागतीची कामे सुरू आहेत..हे सर्व असतांना दुचाकी, चारचाकी वाहणांना पेट्रोलची गरज आहे. अशा अवस्थेत शूक्रवार सायंकाळ पासुन तालुक्यात पेट्रोलची त्रीव टंचाई जाणवत आहे..हिमायतनगर शहरात पाच पेट्रोल पंप असुन आजरोजी एकाही पंपावर पेट्रोल मिळाले नाही. त्यामुळे शेती कामे खोळंबली असुन लग्नाला जाणा-या पाहुण्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पेट्रोल इंधनाची दैनंदिन कामात गरज भासत आहे. त्यामुळे शासनाने त्वरीत पेट्रोल पंपावर वेळेवर उपलब्ध करुन शेतकरी आणी सर्वसामान्य नागरीकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.




