Home Breaking News सामुहिक विवाह हि काळाची गरज* मा. जिल्हाध्यक्ष तिप्पनवार यांचे प्रतिपादन…

सामुहिक विवाह हि काळाची गरज* मा. जिल्हाध्यक्ष तिप्पनवार यांचे प्रतिपादन…

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 10 मे 2026

सध्या लग्नसराई जोरात सुरु असुन वाढती महागाई, वेळेची बचत, पैश्याची बचत होऊन समाजामध्ये एकाओप्याची भावना निर्माण होते..त्याचबरोबर सर्व समाज एकाच छताखाली सर्वाना कामे करता येतील. ग्रामीण भागात समाजाने एकत्रित येऊन सामुहिक निर्णय घेतल्यास विविध बाबींची बचत होऊन समाजामध्ये एकसंघ भावनांची निर्मीती होते.असे प्रतिपादन पेरकेवाड समाज संघटनेचे मा. जिल्हाध्यक्ष गजानन तिप्पनवार यांनी आंदेगांव येथील विवाहसोहळ्या प्रसंगी केले आहे..यावेळी मा. सभापती परमेश्वर गोपतवाड, दिलीपराव अनगुलवार, केशवराव पिंगलवाडसर आनंदराव मुतनेपाड, राजेश्वर अनगुलवार, काशीनाथ फिरंगे, मारोती अक्कलवाड, अशोकराव अनगुलवार, शाखाधिकारी लक्ष्मण गोपतवाड,मु.अ. सतिष गोपतवाड, पो.काॅ. मुकेश आलेवाड, दिगांबर अनगुलवार आदी पाहुणे उपस्थीत होते.

Previous articleआमदार नितीन देशमुख यांची लोहारा येथे सांत्वन भेट