Home Breaking News कळंबी महागाव येथे अजब कारभार , दंवडी न देता घेण्यात आली ग्राम...

कळंबी महागाव येथे अजब कारभार , दंवडी न देता घेण्यात आली ग्राम सभा 

बाळापूर :- अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम गट ग्राम पंचायत कळंबी महागांव येथे कोणत्याही प्रकारची सुचना व दंवळी न देता घेण्यात आली ग्रामसभा. असे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे . कुठल्याही प्रकारची नोटीस न काढता तसेच गावांत कसलीच दंवडी न देता विशेष ग्राम सभेचे आयोजन केल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. ग्राम सभेचे आयोजन करतांना गावांमध्ये दंवडी देणे किंवा आदेश काढले जाते तसे न करता ग्राम सभा घेणे योग्य आहे का असा प्रश्न स्थानिक नागरिक करीत आहेत. ग्रामसेवक साहेब यांनी कोणाच्या सांगण्यावरून ग्राम सभेचे आयोजन केले होते, याचे त्यानी द्यावे असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. पुढच्या वेळी ग्राम सभेचे आयोजन करण्याताना गावांमध्ये दंवडी किंवा आदेश ग्राम पंचायतमध्ये लावावे असे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे . तसेच गट विकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे येथील नागरिकांनी मागणी केली आहे. यावेळी उपस्थित म्हणून अनिल सावळे, सतिश सावळे, मंगेश पटोकार, संदिप सावळे, हिम्मत विरघट,शुभम डाबेराव, बाबुराव सावळे व गावातील नागरिकांनी उपस्थित होते.

Previous articleपोलीस मित्र अपराध नियंत्रण एवं आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेत महत्त्वाच्या नियुक्त्या; जाहीर