मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 11 जुनं 2025
नांदेड जिल्हयात सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे अनेकांची घरे पडली आहेत. आणी रस्त्यावरील झाडे विद्युत डीपीवर पडल्यामुळे हिमायतनगर शहर आणी तालुक्यातील विद्युत पुरवठा तब्बल चौविस तास बंद होता. त्यामुळे नागरीकांचे जनजिवण विस्कळीत झाले आहे. लाईट नसल्यामुळे छोटे, मोठे उद्योग धंदे पडते आहेत. घरावरील पत्रे, टिन अचानक वा-यांने उडाल्याने अनेकांचा संस्कार उघड्यावर पडला आहे. घरातील सामान पावसाने भिजल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
शेतातील झाडे उन्मळुन जमीनीवर पडल्यामुळे शेतक-यांना ती झाडे शेतातुन बाहेर काढण्यासाठी तारेवरची. कसरत करावी लागत आहे.
शासनाने त्वरीत पंचनामे करुन घरपडी, पुरपडीचे अनुदान तात्काळ मंजुर करुन, आर्थीक मदत करावी अशी मागणी जोर धरत आहे.