Home Breaking News मुलांच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत वृद्धाश्रमात केले अन्नदान..

मुलांच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत वृद्धाश्रमात केले अन्नदान..

👉 सामाजिक बांधीलकी जपली कोटुलवार परीवाराने…

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 11 जुनं 2025

मानवी जिवनात आपण समाजाचे काही देणे लागतो. या उदात्त हेतुने किनवट येथील कोटुलवार परीवाराने आपल्या मुलाचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा केला..*आपण सुखी तर जग सुखी* हि भावना लक्षात घेत *चि. ओजस ओमबाबु कोटुलवार* यांचा वाढदिवस साजरा अनावश्यक खर्च टाळत सेवाधाम वाढदिवस साजरा केला आहे.

संतश्री दोला महाराज वृध्दाश्रम उमरी पठार ता. आर्णी जिल्हा यवतमाळ येथे वृध्दाश्रमातील महिला, पुरुषांना भोजन देऊन गेल्या पाच वर्षापासुन आपल्या मुलांचा वाढदिवस एका वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात आला.. अन्नदान व बिस्कीटे वाटुन करत असतात. हे सर्वक्षेष्ठ दान मानलं जातं. हेच औचित्य साधत कोटुलवार परीवारांने गेल्या वर्षापासुन समाजाला एक आदर्श घालुन दिला आहे. या उपक्रमाचे त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे..

चि. ओजसला साप्ताहिक भुमी राजा परीवाराकडुन मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा…..

Previous articleचक्रीवादळामुळे घरे, झाडांचे प्रचंड नुकसान..
Next articleके. व्ही. एन. नाईक चौक या गंगापुर नाका येथील वाहतुक बेट विकसित नामकरणाचा उदघाटनाचा कार्यक्रम मा. दादासाहेब भुसे शालेय शिक्षण मंत्री यांच्या हस्ते उद्या होणार