Home Breaking News महसुल प्रशासनाची दमदार कारवाई* अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर पकडले…

महसुल प्रशासनाची दमदार कारवाई* अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर पकडले…

संदिप देवचे ग्रामीण पत्रकार
9860426674
जलंब : गौण खनिजाची
अवैध रित्या वाहतूक करणाऱ्या ३ ट्रॅक्टरला महसूल पथकातील कर्मचाऱ्यांनी पकडले असल्याची घटना २३ जून रोजी दुपारी मच्छिंद्रखेड शिवारात घडली. या प्रकरणी पोलिसांनी ३ ट्रॅक्टर चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार जवळच असलेल्या मच्छिंद्रखेड शेत शिवारातुन गौण खनिजाची अवैध रित्या वाहतूक करणाऱ्या ३ ट्रॅक्टरला महसूल कर्मचाऱ्यांनी तपासणीसाठी थांबवले असता सदर ट्रॅक्टर चालकांनी महसूल कर्मचाऱ्याला तुम्ही बाजूला व्हा असे म्हणून ते तिन्ही ट्रॅक्टर चालक आपले वाहने घेऊन पळून गेले असून
त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे.
अशी फिर्याद तलाठी सुदर्शन कोळी यांनी जलंब पोस्टेला दिली यावरून पोलिसांनी ट्रॅक्टर चालक सोपान समाधान मुंडाले, सागर बळीराम मुंडे, प्रकाश भीमराव गव्हांदे रा. जलंब यांच्याविरुद्ध अप नं. १२८/२०२५ कलम ३०३ (२), १८६,३ (५) BNS अन्वये
गुन्हा दाखल केला असून सदर कारवाई शेगाव तहसीलदार दिपक बाजड यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकातील कर्मचारी सुदर्शन कोळी, जयश्री उमाळे, मंगेश भारंबे, उन्नती पिल्ले आदींनी केली आहे पुढील तपास ठाणेदार अमोल सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. काॅ नन्हेखा तडवी पोका बोदडे करीत आहेत.

Previous articleशेतक-यांनी फळबाग लागवड करावी..
Next articleहिंदी भाषेच्या सक्ती विरोधात ठाकरे बंधुनी पुकारलेल्या आंदोलानाचे यशाचा नाशिक मध्ये ढोल वाजून पेढे वाटून जल्लोष साजरा