दिनांक 16/08/2025 कल्याण वानखेडे तालुका प्रतिनिधी..
हिमायतनगर तालुक्यातील सतत धार पावसामुळे अतिवृष्टी झाली पैनगंगा नदी आणि छोट्या छोट्या उपनद्या तसेच ओढ नाले यामुळे नद्यांना पूर आला असून नदी कार्य क्षेत्रातील सर्वच गावांना त्याचा थेट फटका बसलेला आहे. जवळजवळ हजारो हेक्टर क्षेत्र पुरामध्ये व्यापले आहे. सोयाबीन, कापूस हळद, ऊस पिके पाण्याखाली गेल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे..
मागील तिन दिवसांपासून हिमायतनगर तालुक्यातीत अतिवृष्टी आणि पावसामुळे नदी नाल्याच्या पुराने शेतात थैमान घातले आहे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली बुडाल्या आहेत काही पिकांचे अतिवृष्टी मुळे पिके हातची गेली आहे त्यामुळे पहिलाच शेतकरी संकटाचा असताना आता आसमानी संकट शेतकऱ्यांसमोर उभे टाकले आहे. नाल्या आणि नदी काठावरील शेत जमिनीचा सुपीक थर पाण्यासोबत वाहून गेलेला आहे जमिनी खरडून गेलेले आहे शेतात सध्या चिखल साचलेला असून शेतात कोणतेही काम करता येत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे त्यामुळे आधीच पिकाचे नुकसान झाले त्यातच जमिनी खडून गेल्याने दीर्घकाळासाठी यांचा परिणाम होणार असल्याने शासनाने नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत..
शेतात साचल्यामुळे उभ्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित विभागाने शेतीची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी…



