Home Breaking News उपविभागीय कृषि अधिकारी किनवट रणविर आणी हदगाव कृषि कार्यालयातील अनुरेखक सोनटक्के नियत...

उपविभागीय कृषि अधिकारी किनवट रणविर आणी हदगाव कृषि कार्यालयातील अनुरेखक सोनटक्के नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतुन सेवानिवृत्त.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 31 जुलै 2025

महाराष्ट्र शासन कृषि विभागात हदगाव तालुका कृषि अधिकारी पदावरुन उपविभागिय कृषि अधिकारी म्हणुन आज रोजी नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतुन राजकुमार रणविर सर हे 31 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. रणविर सर अत्यंत मनमिळावु स्वभावाचे होते. प्रशासनामध्ये काम करत असतांना अतिशय नियमबध्द पध्ततीने काम करण्याची त्यांची हातोटी होती…स्वभाभावाने ते प्रेमळ होते. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना किंवा उपविभागातील सर्व तालुका कृषि अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्यात.

शिवाजी सोनटक्के हेही आज रोजी नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतुन सेवानिवृत्त झाले आहेत. सोनटक्के साहेब हे प्रशासकीय कामकाज करीत असताना काटेखोरपणे करीत असत. वेळेचे महत्व जाणुन वेळचेवेळी काम करीत होते. कार्यालयातील सर्व अधिकारी , कर्मचारी त्यांचे प्रशासकीय कामकाज पाहुन त्यांची नेहमीच प्रशंसा करीत असत..सुंदर अक्षर हे त्यांच्या लेखणीने खरे वैशिष्ट्य होते. मला त्यांच्यासोबत सन 2010 पासुन 2013 प्रयंत तालुका कृषि अधिकारी हिमायतनगर कार्यालयात काम करण्याची संधी मिळाली आहे..

त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनपुर्वक शुभेच्छा देत हदगाव तालुका कृषि कार्यालयाने त्यांचा गौरव केला आहे.

Previous articleपेरकेवाड समाजाचे पाऊल पडते पुढे……
Next articleप्रा. माने, डाॅ. वाघमारे आणी हेंद्रे हे नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतुन सेवानिवृत्त.