Home Breaking News जलंब येथे आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद 

जलंब येथे आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद 

ग्रामीण पत्रकार संदिप देवचे 9860426674

शेगाव: तालुक्यातील जलंब येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आज वनराई बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले.तसेच गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून आणि स्थानिक नागरिकांच्या श्रमदानातून पार पडलेल्या या उपक्रमात मोठ्या संख्येने गावकरी सहभागी झाले.कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक, तसेच पंचायत समितीचे संबंधित अधिकारी शिक्षक वर्ग आरोग्य विभागातील कर्मचारी तलाठी बचतगट अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स आणी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गाव जलसमृद्ध व शाश्वत करण्याच्या उद्देशाने हा बंधारा उभारण्यात आल्याचे सांगण्यात आले.सदर बंधाऱ्यामुळे परिसरातील पाणी साठवून भूमिगत जलस्तर उंचावण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांना सिंचनासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल. तसेच बंधाऱ्याच्या कडेला तयार झालेल्या मार्गामुळे शेतकऱ्यांना शेतात ये–जा करण्यासाठी सोयीचा रस्ता उपलब्ध झाला आहे.अभियानाच्या माध्यमातून गावातील अन्य विकासकामेही वेगाने राबविण्याचा संकल्प जलंब ग्रामपंचायतीकडून करण्यात आला.ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा प्रकारच्या योजना सातत्याने राबविल्या तर जलंब गाव आदर्श व समृद्ध पंचायतराजाचा नमुना ठरेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Previous articleहिमायतनगर तालुक्यातील शेतक-यांनी महाविस्तार एआय अॅपचा वापर शेतीविषयक माहिती मिळवावी…
Next articleआदर्श ज्ञानपीठ ची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न..