हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज
मो. नंबर – 8983319070
प्रतिनिधी( निफाड )नांदूर मध्यमेश्वर पुण्यनगरीला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषण सिंह राजे होळकर यांनी सदिच्छा भेट दिली याप्रसंगी होळकर वाडा संदर्भात संपूर्ण प्रकरण त्यांनी जाणून घेतले त्याचप्रमाणे होळकर वाड्याच्या अव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली मंदिराची होत असलेली वाहतात बघता महाराजांनी यासंदर्भात त्वरित पावले उचलून या मंदिरा संदर्भाचे काम लवकर मार्गी लावण्यासंदर्भात सुतोवाच केले परंतु मंदिर ही गावाची सार्वजनिक संपत्ती असून संपूर्ण गावासाठी मंदिर हे सार्वजनिक रित्या खुले असणे गरजेचे असून मंदिराची होत असलेली अवस्था व खाजगीकरण या संदर्भात चिंता व्यक्त केली व भविष्यात या संदर्भात गावकऱ्यांशी चर्चा करून व सरकारशी बोलणी करून लवकरात लवकर मार्ग काढण्यासंदर्भात सुतोवाच केले प्रसंगी गावातील अनेक नागरिक तेथे उपस्थित होते उपस्थितांच्या वतीने भूषण सिंह राजे होळकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला तसेच याआधीची होळकर वाड्याची पार्श्वभूमी बघता भूषण सिंहराजे होळकर यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मोलाचा मानला जात आहे.
या सदिच्छा भेटीनंतर भूषण सिंह राजे होळकर हे होळकर वाडा संदर्भात कशाप्रकारे प्रयत्न करतात हे बघणे उत्सुकतेचे ठरेल तसेच होळकर वाड्याचा होत असलेला खाजगी करण्याचा प्रयत्न हा यशस्वी होतो की गावकऱ्यांचे मंदिर वाचवण्याचे प्रयत्न यशस्वी होतात हेही येणाऱ्या काळामध्ये बघणे महत्त्वाचे ठरेल मंदिरांचे उद्देश हा गावाची धार्मिक बांधिलकी जपून गावाकडून मंदिरातील देवांची सेवा व्हावी व मंदिरांची देखरेख गावाच्या आखत्यारीत राहून मंदिरांचा सार्वजनिक वापर व्हावा हा मूळ उद्देश गावकऱ्यांचा असून गावकऱ्यांनी त्या संदर्भात प्रयत्न करीत असल्याचे सांगितले व महाराजांनीही सदर मंदिर हे गावाची सार्वजनिक वास्तू असून ते परत एकदा गावाच्या स्वाधीन करण्यासाठी गावास मदत करावी मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांनी हे आमच्या गावासाठी दिलेले दान असून हे मंदिर परत एकदा आमच्या गावासाठी सार्वजनिक रित्या खुले व्हावे यासाठी भूषण सिंह राजे होळकर यांना साकडे घातले आहे
प्रसंगी होळकरांचे वंशज मुकुंद राजे होळकर अशोक थिटे पाटील , धनगर समाजाचे नेते खंडेराव पाटील, समाधान बागल लक्ष्मण बर्गे दीपक सुडके,तसेच , भाऊसाहेब भवर राजेंद्र बडे भाऊसाहेब पानसरे वाल्मीक बडे बाळू पगारे रामदास काळे भगवान जाधव आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते




