Home Breaking News महाशिवरात्री निमित्त श्रीक्षेत्र परमेश्वर मंदिरात श्रीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा…

महाशिवरात्री निमित्त श्रीक्षेत्र परमेश्वर मंदिरात श्रीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा…

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 17 फेब्रुवारी 2026

हिमायतनगर येथील श्री परमेश्वर क्षेत्र परमेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने मध्यरात्री दर्शनासाठी बारा वाजता पासुनच गर्दी दिसुन आली..संबंध भारतात श्री हरीहर परमेश्वर भगवान म्हणजेच महाधिदेव शंभु शंकराची उभी मुर्ती हि एकमेव हिमायतनगर शहरात आहे. त्यामुळे विदर्भ, तेलंगणा आदी भागातुन भाविकभक्त श्रीच्या दर्शनासाठी आले होते..लाखो भाविकांनी या पवित्र पर्वावर श्रीचे मनोभावे दर्शन घेतांना दिसुन आले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दुध, केळी, शाबुदाना उसळ, नायलोन शाबुदानाचे वाटप दानशुर, व्यक्ती व संघटनांनी केले आहे.

*हरहर महादेव* *परमेश्वर भगवान की जय* अशा गजरात भावीकांनी अतिशय शांततेने श्रीचे दर्शन घेतले आहे..

श्रीक्षेत्र परमेश्वर मंदिर ट्स्ट समितीकडुन अतिशय छान नियोजन केले असुन पंधरा दिवस हि यात्रा भरणार आहे..

सोमवारी मध्यरात्री 2:55 मिनीटानी श्रीचा अलंकार सोहळा पार पडला आहे. श्रीचा अलंकार सोहळा पाहण्यासाठी विविध भाविकभक्तांनी एकच गर्दी केलेली दिसुन आली..मंदिरात चोख पोलीस बंदोबस्त असुन एकंदरीत शहरात महाशिवरात्री निमित्त भक्तीमय वातावरणात भाविकभक्त न्हाऊन गेले आहेत…

Previous articleश्रीराम मंदिराबरोबरच नांदूर मधमेश्वर गावाच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक विकासासाठी प्रयत्न करणार भूषण सिंह राजे होळकर
Next articleजलंब येथे आज टाळमृदुंगाच्या गजरात साजरी झाली छत्रपती शिवरायाची जयंती..