ग्रामीण पत्रकार संदिप देवचे 9860426674
जलंब येथे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण गाव टाळ-मृदुंगाच्या प्रखर गजरात भारून गेले, तर लहान मुलांच्या सहभागाने-वातावरणाने शिवरायांच्या शौर्याची आठवण करून दिली.मिरवणुकीत जलंब-माटरगाव येथील टाळकऱ्यांनी आपल्या कुशल वादनाने पर्यावरणात उत्साह भर घातला. लहान मुलींनीही टाळ व मृदुंग हातात घेऊन सहभाग घेतला. यंदाच्या मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले ते जलंब येथील पत्रकार संदीप देवचे यांचे लहान चिरंजीव अथर्व देवचे यांनी शिवाजी महाराजांचा पूर्ण पोशाख परिधान करून मिरवणुकीत लक्ष वेधले.
तर राजेश पळस्कार यांची कन्या जानवी पळस्कार ही जिजामाता बनून मिरवणुकीत सहभागी झाली, ज्यामुळे सर्वांनाच कौतुक वाटले.संपूर्ण गावात घरा-घरांन जवळ महिला न कडुन रांगोळ्या काढण्यात आल्या व ठीक ठीकानी शिवरायांची प्रतिमा ठेवुन पुजन करण्यात आले संताजी महाराज चौक येथे चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पडली.. जलंब पोलीस प्रशासनाचे उत्तम प्रकारे सहकार्य लाभले गावकऱ्यांनी शिवरायांच्या आदर्शांचा स्मरण करून घेतला आणि जयंती मोठ्या थाटामाटात साजरी झाली…पुढच्या वर्षी पण अशाच स्वरूपात शिवरांयाची जयंती साजरी करू असे या वर्षी चे समिती अध्यक्ष श्रीकृष्ण भागवत तर उपाध्यक्ष नितीन इंगळे यांच्या कडुन सांगण्यात आले..




