Home Breaking News वाचनाने माणूस प्रगल्भ बनतो: प्रा. डॉ. संजय जाधव

वाचनाने माणूस प्रगल्भ बनतो: प्रा. डॉ. संजय जाधव

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर – 8983319070

आई वडिलांनी लहानपानापासून संस्कार दिले. वडिलांनी सांगितले की साहेब बनण्यासाठी वाचावे व शिकावे लागते. सर्व प्रथम मी शिवाजी महाराजांचे पुस्तक हातात धरले तेव्हापासून मला वाचायची आवड निर्माण होऊन मी आज उत्तम साहित्यिक झालो.
आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर रोज थोडे थोडे वाचन करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन प्रा. डॉ. संजय जाधव यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नाशिक रोड आयोजित संवाद सृजनाशी मालिकेतील 34 पुष्प गुंफतांना केले.

“विश्वासाला गेले तडे, अश्रूंचे पडे सडे”

“दुःख सांगावे किती दुःख तोलावे किती, जीवनाच्या तराजूत दुःख टाकावे किती”

“सकाळ जाईल दुपारी येईल मनामध्ये कुढू नको, आयुष्याच्या वाटेवर चालायला थकू नको”.

“मातीत जन्मलो मातीतच मरणार आहे, मातीच्या रक्षणार्थ आयुष्यभर लढणार आहे”.
मातीलाच आई मानून पूजा मातीचीच करणार आहे, जमलेच तर दोन अश्रू मातीसाठी ढाळणार आहे”.

असे काहूर, गुलमोहर हे दोन काव्य संग्रह तसेच कथासंग्रह त्यांचे प्रकाशित झाले आहे.

त्यांच्या उत्तम लिखाणामुळे व पत्रकारितेमुळे त्यांनी गोविंदराव आदिक व सुशीलकुमार शिंदे यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
त्यांच्या या कार्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाचा कृषी रत्न पुरस्कार मिळालेला आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नाशिक रोड तर्फे आयोजित संवाद सृजनांची पर्व दुसरे पुष्प 34 गुंफण्यासाठी प्रा. डॉ. संजय जाधव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमाला अलका हिरे , संगीता पाटील, रेखा पाटील, रामचंद्र शिंदे, योगेश कापडणीस , पांडुरंग चव्हाण, सुधीर ठोसर, वृंदा देशमुख, डॉ. वसंत सहस्रबुद्धे, दशरथ लोखंडे, हेमंत शिंदे उपस्थित होते.

स्वागत काव्य दशरथ लोखंडे यांनी म्हटले. प्रमुख पाहुणे यांचा परिचय योगेश कापडणीस यांनी केला. सूत्रसंचालन संगीता पाटील प्रास्ताविक सुमन हिरे व आभार गणपतराव मुठाळ यांनी केले.

Previous articleजलंब येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान
Next articleसुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव सोहळा चांदवडला थाटामाटात साजरा..