Home Breaking News सेवानिवृत्ती नंतर उर्वरित आयुष्य समाजसेवेसाठी घालवा :-विजय अंभोरे

सेवानिवृत्ती नंतर उर्वरित आयुष्य समाजसेवेसाठी घालवा :-विजय अंभोरे

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी

खामगाव अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्तीपर्यंत आपापल्या क्षेत्रात काम करतोच परंतु सेवानिवृत्तीनंतर उर्वरित आयुष्य समाजाच्या उत्थानाकरिता घालविणे आज काळाची गरज आहे असे उद्गार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे संस्थापक विजय अंभोरे यांनी काढले दिनांक ०३ जुलै रोजी खामगाव येथे सेवानिवृत्त सहाय्यक अध्यापक शा.ना.मानकर यांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते याप्रसंगी खामगाव उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी बी.के.खरात केंद्रप्रमुख सुरेश डाबेराव वेदांत प्रॉपर्टीचे संचालक गजेंद्रजी बोरकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश टिकार आदी मान्यवर उपस्थित होते

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते संतारामजी तायडे यांनी केल्यानंतर खामगाव उपविभागीय अधिकारी राजेंद्रजी जाधव सारोडकर सर चोपडे सर निगम मॅडम या मान्यवरांनी शुभेच्छांवर आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन अशोक तायडे व समारोपिय आभार प्रदर्शन सेवानिवृत्त सत्कारमूर्ती शा.ना.मानकर यांनी केले याप्रसंगी अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे युवा जिल्हाध्यक्ष कृष्णा नाटेकर जिल्हा कार्याध्यक्ष गजानन सोनोने दीपक गायकवाड सुधाकर वानखडे कासारकर भाऊ शंकर वाघ शा.ना.मानकर शिक्षक मित्र परिवार आदि बहुसंख्येने उपस्थित होते

Previous articleपावसाळा आला तरी महामार्गावर पुलांचे काम अपूर्णच !
Next articleपूर्णेतील अंडरग्राउंड रेल्वे पूलाखाली पाणी साचल्याने रहादारीस मोठा अडथळा