Home Breaking News महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे साकडे...

महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे साकडे :- अजयसिंह सेंगर

मुंबई :-राज्य सरकारने मातंग, धनगर, बौध्द, वंजारी, मराठा, बंजारा,चर्मकार समाजा करिता विविध महामंडळे निर्माण केली, मग राजपूत समाजा करिता का नाही ? राजपूत समाजामध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणाना रोजगार करिता कर्ज देणे करिता “महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ” स्थापना करण्यासाठी राजपूत समाजाचे नेते व राजपूत महामोर्चाचे प्रमुख अजय सिंह सेंगर यानी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली,

राजपूत समाजाच्‍या विकासा करिता महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे बाबत निवेदन दिले .
राजपूत समाज राज्यामध्ये अविकसित आहे, बेरोजगारी वाढत आहे हे माननीय देवेंद्र फडणवीस यांचा लक्षात आनुन दिले, तसेच पद्मावती सिनेमा आंदोलनाचे खटले विड्रोल बाबत निवेदन दिले.

Previous articleअतिवृष्टीने “होत्याचं नव्हतं झालं”….
Next articleमाय, बाप सरकार पिक नाही! आमचं काळीजचं नेलं हो नदीनं.