Home Breaking News हिंगणा येथील अंगणवाडीचे बांधकाम अर्धवट अवस्थेत…!!

हिंगणा येथील अंगणवाडीचे बांधकाम अर्धवट अवस्थेत…!!

खामगाव:-तालुक्यातील गट ग्रामपंचायत संभापूर, हिंगणा येथील अंगणवाडी इमारतीचे बांधकाम एक दिड वर्षांपासून रखडले आहे. परिणामी ठेकेदारांच्या मनमानी पणामुळे अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलांना प्राथमिक शाळेतील इमारतीचा आश्रय घ्यावा लागत आहे. ठेकेदाराने अंगणवाडी चे अर्धवट काम करून याकामाकडे पाठ फिरवली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला अंगणवाडी मध्ये सुरुवात होते. याशिवाय याठिकाणी बालकांचे लसीकरण, गर्भवती महिलांचे लसीकरण,स्तनदा मातांना पोषण आहाराचे वाटप अशा एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या विविध योजनांची याठिकाणी अंमलबजावणी केली जाते. गावातील महिलांना एकत्र येण्याचे हे हक्काचे ठिकाण असते.
मात्र गेल्या एक दिड वर्षांपासून सदर बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे. हिंगणा येथील अपूर्ण असलेल्या अंगणवाडी केंद्राच्या बांधकामाकडे प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित कंत्राटदार पसार झाल्याची माहिती समोर येत आहे. सदर अंगणवाडी केंद्राच्या इमारतीचे बांधकाम अर्धवट असल्याने, अंगणवाडी केंद्रातील मुलांनी बसावे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने बालकांची भटकंती होत आहे. अंगणवाडी इमारतीचे अर्धवट असलेले बांधकाम त्वरित मार्गी लावण्यात यावे अशी मागणी हिंगणा येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Previous articleन्या. धनंजय यशवंत चंद्रचूड बनले देशाचे 50 वे सरन्यायाधीश
Next articleओझोन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अकोला येथे ओझोन  वाचनालयाचे उदघाटन