Home Breaking News जिल्हा कृषी विभागाची हिमायतनगरात आर्थिक तडजोड….?

जिल्हा कृषी विभागाची हिमायतनगरात आर्थिक तडजोड….?

????????चौकशीच्या नावाखाली तडजोड करून अधिकारी व कृषी दुकानदारांनी मारला गावरान धाब्यावरील जेवणावर ताव..

????????दुसरीकडे हिमायतनगर शहरात लाच लुचपत विभागाची टीम आल्याची जोरदार चर्चा….पण कार्यवाही शुन्य

अंगद सुरोशे
हिमायतनगर प्रतिनिधी /- शहरात एकीकडे खत, बि-बियाणांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार कारणाऱ्यांवर कारवाईचा इशारा द्यायचा आणि दुसरीकडे त्याच दुकानदारांशी आर्थिक तडजोड करायची असा प्रकार जिल्हा कृषी विभागाने सुरु केला आहे पण जिल्हा कृषी अधिकाऱ्यांसह त्यांच्या पथकाचा हा प्रकार हिमायतनगरमध्ये उघड झाला.

शहरातील बड्या एकाही कृषी दुकारांची चौकशी न करता जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे हे शहरातील काही कृषी दुकानदारांसोबत आर्थिक तडजोड करून खडकी फाटा येथील गावरान धाब्यावर बसून जेवणावर ताव मारून निघून गेले. जेवणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे. पण या चौकशीचे गुड अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे…

खताची व बी बियाण्याची कृत्रिम टंचाई करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणुक करण्याचे काम हिमायतनगर शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे ही पिळवणुक थांबावी यासाठी जिल्हा कृषी विभाग कार्यवाही करते. परंतु शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी असलेले कृषी विभाग कृषी शहरातील काही दुकानदारां सोबत काही आर्थिक तडजोड करीत असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे हे कितपत खरे आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही

शहरात बि-बियाणांची चढ्या दराने विक्री होत आहे अत्यावश्यक खतांची काही दुकानदार कृत्रिम टंचाई करून बे भाव दराने विक्री करतात आणि एकीकडे जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब बाहाटे व त्यांचे पथक हिमायतनगर शहरातील कृषी दुकानांची तपासणी करण्यासाठी आले होते पण पाहणी न करता त्यांनी शहरातील काही कृषी दुकानरांना एकत्र करुन आर्थिक तडजोड केली शेवटी त्याच दुकानदारांसोबत राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एका निसर्गरम्य गावरान धाब्यावर बसून तेथील जेवणावर ताव मारला तेथे उपस्थित कृषी अधिकारी ,कृषी केंद्र चालकां सोबत पार्टी करत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला होत आहे

या बाबत शहरातील काही सुजाण पत्रकारांनी जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांना हिमायतनगर शहरात केलेल्या कारवाई बाबत विचारले असता त्यांनी इस्लापूर येथील जगदंब नावाच्या कृषी केंद्रावार कारवाई केल्याचे सांगितले. परंतु हिमायतनगर शहरात २० ते २२ मोठे कृषी दुकाने असतांना एकावरच कारवाई का ? असा प्रश्न केला असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली..! दरम्यान हिमायतनगर तालुक्यात जवळपास ७० च्या वर कृषी केंद्र आहेत तर शहरात २० ते २२ दुकाने आहेत. जिल्हा कृषी अधिकारी व त्यांच्या पथकाने एकाही दुकानाची तपासणी केली नाही त्यामुळे संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्याच्या कार्यकर्ते वर संरक्षण निर्माण होत आहे व एकीकडे हिमायतनगर शहरात पंचायत समिती विभागा च्या कार्यालया जवळ लाच लजपत विभागाचे एक पथक आल्याची जोरदार चर्चा काल दिवस भर पंचायत समितीच्या प्रशासकीय मंडळात ऐकायला मिळाली त्यामुळे या लाच लुचपत विभागाचा या अधिकाऱ्यांशी काही संबंध होता की काय ? हे सुद्धा अद्याप स्पष्ट झाले नाही….

Previous articleवंचित बहूजन आघाडी च्या जिल्हा परिषद सदस्या यांनी कवठा येथील वडिल नसलेल्या दोन मुलीचा शिक्षणाचा उचला खर्च
Next articleआज व्याळा तालुका बाळापूर येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आद. सुजात दादा आंबेडकर यांनी दिली सात्वन भेट..*